• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईकरांची कॉलर टाईट करणारी बातमी! इंटरनॅशनल यादीत Top 10 मध्ये पहिल्यांदा एन्ट्री; यादीत पहिल्या नंबरला कोणतं शहरं?

मुंबईकरांची कॉलर टाईट करणारी बातमी! इंटरनॅशनल यादीत Top 10 मध्ये पहिल्यांदा एन्ट्री; यादीत पहिल्या नंबरला कोणतं शहरं?

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 11:25 IST|Updated: Nov 25, 2026, 11:53 IST
joinshare
आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मजबूत स्थिती, दर्जेदार व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि इतर घटकांचा विचार करुन मुंबईचा या मानाच्या यादीत समावेश करण्यात आलाय. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात...

मुंबईने पहिल्यांदाच या यादीत अव्वल 10 शहरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. मुंबईसंदर्भात नक्की काय म्हटलंय आणि हे स्थान का देण्यात आलंय जाणून घ्या...

mumbaicity1/10

मुंबईला जागतिक स्तरावरील मानाच्या यादीत स्थान मिळालंय

मुंबईकरांची कॉलर टाइट करणारी एक यादी समोर आली असून मायानगरीने अव्वल 10 शहरांमध्ये स्थान मिळवलंय. ही यादी कशासंदर्भात आहे. यात मुंबईसंदर्भात काय म्हटलंय पाहूयात...
mumbainewscity2/10

पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईने स्थान मिळवले

जागतिक रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी मुंबईचे आकर्षण असून आशिया-पॅसिफिक वाढत क्षेत्रातील रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी पसंतीच्या पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईने स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय रिअल इस्टेट सल्लागार कंपनी 'कोलियर्सच्या 2027 ग्लोबल इन्व्हेस्टर आउटलुक' अहवालातून ही बाब स्पष्ट झाली.
mumbainewscity3/10

रिअल इस्टेट बाजारपेठेवरील विश्वास वाढतोय

जागतिक गुंतवणूकदारांचा भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेवरील विश्वास वाढत असल्याचे या अहवालातून दिसून येते. मुंबईची आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मजबूत स्थिती, दर्जेदार व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता, कार्यालयीन जागांची वाढती मागणी आणि पायाभूत सुविधांमधील सुधारणा यामुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. या यादीत मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे.
mumbainewscity4/10

व्यावसायिक आणि औद्योगिक विकास क्षेत्रांना चालना

अटल सेतू, नवी मुंबई विमानतळाचा फायदा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम होत आहे. यामुळे नव्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकास क्षेत्रांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
mumbainewscity5/10

संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल

मुंबईत कार्यालयीन जागांसाठी असलेली मागणी, बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती आणि गुंतवणुकीसाठी असलेल्या दर्जेदार मालमत्ता यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल या शहराकडे वाढत असल्याचे अहवालात नमूद केले.
mumbainewscity6/10

कार्यालयीन मालमत्तांना पसंती, 37 टक्के गुंतवणूक

भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत कार्यालयीन मालमत्तांचा वाटा मोठा आहे. 2026 मधील जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांत देशातील एकूण रिअल इस्टेट गुंतवणुकीपैकी 37 टक्के गुंतवणूक कार्यालयीन मालमत्तांमध्ये झाली.
mumbainewscity7/10

ग्रेड ए कार्यालयीन मालमत्तांना पसंती कायम

मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथील ग्रेड ए कार्यालयीन मालमत्तांना पसंती कायम राहण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जागतिक क्षमता केंद्रे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून उच्च दर्जाच्या कार्यालयीन जागांची मागणी वाढत आहे.
mumbainewscity8/10

डेटा सेंटर, हॉटेल क्षेत्रात गुंतवणुकीला वेग

गुंतवणूकदारांचा कल केवळ कार्यालयीन आणि निवासी मालमत्तांपुरता मर्यादित नाही. औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, डेटा सेंटर तसेच अन्य पर्यायी मालमत्ता क्षेत्रांमध्येही गुंतवणूक वाढत आहे.
mumbainewscity9/10

गुंतवणूक वाढली

2026 च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतातील पर्यायी मालमत्ता आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील गुंतवणूक मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत सहा ते सात पटींनी वाढल्याचे अहवालात नमूद आहे. मुंबईमध्ये मोठ्या क्षमतेच्या डेटा सेंटरसाठी वाढती मागणी आणि डिजिटल सेवांचा विस्तार यामुळे या क्षेत्रातही गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
mumbainewscity10/10

टोकियो पहिल्या क्रमांकावर

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सीमापार रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी टोकियोने पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर ओसाका आणि सिडनी यांचा क्रमांक लागतो. मेलबर्न, सिंगापूर, ब्रिस्बेन, सपोरो आणि सोल यांसारख्या शहरांचाही पसंतीच्या बाजारपेठांमध्ये समावेश आहे. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य- 'रॉयटर्स'वरुन साभार)
TAGS:
Mumbai
Mumbai News
Marathi News
Infrastructure news

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये कोण कोणाशी लढणार? वाचा सेमीफायनल सामन्यांच्या तारखा आणि वेळ...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये कोण कोणाशी लढणार? वाचा सेमीफायनल सामन्यांच्या तारखा आणि वेळ...

2

'बिहारी महिला एवढ्या मोठ्या आकाराचा सिंदूर लावतात, तो त्यांच्या पतीच्या...', स्टॅण्डअप कॉमेडियनचं अत्यंत घाणेरडं विधान; बिहारमध्ये संतापाची लाट

3

UAE विरुद्ध सामन्याआधी 'या' दिग्गजाकडून वैभव सूर्यवंशीने घेतल्या टिप्स! पहा Video

4

आजपासून 'या' 4 राशींसाठी अडचणी वाढणार, राहु-केतु गोचरमुळे करिअर - आर्थिक बाबतीत सावध राहा अन्यथा...

5

मऊ, स्पंजी आणि ताजं पनीर हवंय? 2 लिटर दुधातून बनवा या सोप्या पद्धतीने

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.