मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे, मागील काही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये चाहत्यांना मनोरंजक सामने पाहायला मिळाले. भारताच्या संघाला पाकिस्तानने पराभूत केले तर पहिल्या गटामधील बांग्लादेशने देखील एक सामना गमावला आहे. भारताच्या संघाने यूएईच्या संघाला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे आणि पाकिस्तानच्या संघाने ग्रुप स्टेजचा एकही सामना न गमावता पाकिस्तानचा संघ अपराजित सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. ग्रुप अ मधील श्रीलंकेचा अ संघ हा अपराजित सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आहे. मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये सेमीफायनलचे सामन्याचे वेळापत्रक सविस्तर वाचा.
पहिल्या गटामधील अव्वल स्थानावर असलेल्या श्रीलंका अ संघाचा सामना हा दुसऱ्या गटामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत अ संघाशी होणार आहे. तर पहिल्या गटामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांग्लादेश अ संघाचा सामना हा दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तान अ संघाशी होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना हा भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणार आहे. पहिल्या सामन्याचे आयोजन हे 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना हा पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ यांच्यामध्ये रंगणार आहे. पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ यांच्यामध्ये होणारा सामना हा 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा
पहिला सेमीफायनल सामना - 26 नोव्हेंबर 2026 - भारत अ विरुद्ध श्रीलंका अ - भारतीय प्रमाण वेळेनुसार 3.30 वाजता
दुसरा सेमीफायनल सामना - 27 नोव्हेंबर 2026 - पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ - भारतीय प्रमाण वेळेनुसार 3.30 वाजता
सेमीफायनलमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये विजयी संघ अंतिम सामना खेळतील.