• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले 'तसले' फोटो Viral करणाऱ्या आरोपीला सोडून देण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश, कारण...

अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले 'तसले' फोटो Viral करणाऱ्या आरोपीला सोडून देण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश, कारण...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 16, 2026, 07:23 AM IST|Updated: Nov 16, 2026, 07:57 AM IST
joinshare
मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी थेट दिल्लीमधून आरोपीला अटक केली. मात्र अटकेनंतर या आरोपीला सोडण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. नेमकं कोर्टाने काय म्हटलंय जाणून घ्या...

अभिनेत्रीने सोनाक्षी सिन्हाने तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने पोलिसांनी दिल्लीतून आरोपीला अटक केली. पण त्याला सोडण्याचे आदेश पोलिसांनी का दिले? वाचा कोर्टात नेमकं काय घडलं?

sonakshisinhainstagram1/8

मॉर्फ करून तसले फोटो व्हायरल केल्यानंतरही आरोपीला सोडण्याचे कोर्टाचे आदेश

अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले तसले फोटो Viral केल्याप्रकरणी आरोपीला सोडण्याचे पोलिसांना आदेश, कारण...
sonakshisinhainstagram2/8

फोटोंमध्ये छेडछाड करून....

फोटोंमध्ये छेडछाड करून सेलिब्रिटींना बदनाम करण्याचा प्रकार काही नवा नाही. खरं तर आजपर्यंतच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा 'मॉर्फ' फोटोंना बळी पडल्या आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने एडीट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रींच्या यादीत आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचाही समावेश झाला असून तिचे काही फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आलेत. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
sonakshisinhainstagram3/8

न्यायालायने त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षीने तिचे फोटो मॉर्फ करून नग्नावस्थेत असल्याचं दाखवत व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दिल्लीतील एका व्यक्तीला अटक करून मुंबईत आणण्यात आलं. मात्र शनिवारी न्यायालायने त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले. आरोपीला अटक केल्यानंतरही का सोडण्यात आलं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात... (फोटो - फ्रीपिकवरुन साभार)
sonakshisinhainstagram4/8

पोलिसांनी तत्काळ कारवाई केली

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात आपल्या मॉर्फ फोटोंसंदर्भात तक्रार नोंदवली. दिल्लीतील एक व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मॉर्फ केलेली माझी नग्न छायाचित्रे पसरवत आहे, असा आरोप सोनाक्षीने केला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आर्यन दीपक जैन नावाच्या व्यक्तीला आरोपी म्हणून ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी दिल्लीतील शहादरा भागातील जगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला तातडीने मुंबईत आणले गेले. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
sonakshisinhainstagram5/8

कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नव्हते

मुंबई पोलिसांनी जैनला वांद्रे न्यायालयातील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना या प्रकरणात वापरण्यात आलेल्या त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा शोध घ्यायचा आहे, ज्याचा वापर करून सोनाक्षीची मॉर्फ नग्न फोटो तयार करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने सोनाक्षीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची विनंती फेटाळून लावली आणि आरोपीला मुक्त करण्याचे आदेश दिले. दंडाधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, दिल्लीतून मुंबईला आणताना पोलिसांनी अनिवार्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नव्हते. ही अटक 'बेकायदेशीर' असल्याचे दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
sonakshisinhainstagram6/8

तक्रारदार सेलिब्रिटी असल्यामुळे...

सुनावणीदरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला तीव्र विरोध केला. ही अटक अनिवार्य आहे. कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करणारी ही अटक आहे, असा युक्तीवाद करण्यात आला. वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी ना कोणती नोटीस दिली होती, ना जैनला त्याच्या अटकेचे कारण सांगितले गेले. असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला की, स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर न करताच त्याला दिल्लीच्या अधिकारक्षेत्रातून बाहेर काढून मुंबईला आणले गेले. त्यामुळे सोनाक्षी प्रकरणातील या आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश देण्याची विनंती बचाव पक्षाने केली. तक्रारदार सेलिब्रिटी असल्यामुळे पोलिसांनी अत्यंत घाईने ही कारवाई केली, असंही बचाव पक्षाने म्हटलं. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
sonakshisinhainstagram7/8

आरोपीची सुटका करण्याचे आदेश

दुसरीकडे, जैनने आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असा दावा केला. त्याने असा युक्तिवाद केला की, या प्रकरणात लावण्यात आलेली कलमे प्राथमिकदृष्ट्या लागू होत नाहीत. न्यायालयाने नमूद केले की, जैन यांना अटक केल्यानंतर दिल्लीतील जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याऐवजी थेट मुंबईला आणण्यात आले होते. "असे दिसून येते की पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून थेट या न्यायालयासमोर आणले, परंतु त्याआधी जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. विहित प्रक्रिया न पाळण्याबाबत तपास यंत्रणेला समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही असेही न्यायालयाने निदर्शनास आणून देत या प्रकरणात सोनाक्षीचा फोटो मॉर्फ करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
sonakshisinhainstagram8/8

...म्हणून ही अटक समर्थनीय ठरू शकत नाही

संबंधित गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. केवळ पुढील तपासाची गरज आहे, या कारणास्तव विहित कायदेशीर प्रक्रियांचे पालन न करता कोणालाही अटक करणे किंवा कोठडीत ठेवणे समर्थनीय ठरू शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश दिले. (फोटो - फ्रीपिकवरुन साभार)
TAGS:
Entertainment News
crime
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार

जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार

2

पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू

3

महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली, 'हा' जिल्हा ठरला सर्वाधिक थंड, तापमान तब्बल...

4

आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 : सूर्य गोचर काहींसाठी लाभदायक, तर काहींसाठी घातक, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

5

भारताला अंडर-19 आशिया कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मोहित उल्वाला लागली लॉटरी, वरिष्ठ संघात मिळाली संधी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.