• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू

पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील आंबे गावातील घटनेमध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 07:38 AM IST|Updated: Nov 16, 2026, 08:14 AM IST
joinshare
पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू
Image Credit: Pandharpur taluka accident

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार

जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार

2

पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू

3

महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली, 'हा' जिल्हा ठरला सर्वाधिक थंड, तापमान तब्बल...

4

आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 : सूर्य गोचर काहींसाठी लाभदायक, तर काहींसाठी घातक, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

5

भारताला अंडर-19 आशिया कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मोहित उल्वाला लागली लॉटरी, वरिष्ठ संघात मिळाली संधी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील आंबे गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विहीर खोदत असताना त्यात कोसळून चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले असून दोघांचा अजून शोध सुरू आहे. NDRF टीमने पोकलेनच्या माध्यमातून कामगाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण चौघांना वाचविण्यात त्यांना यश आलं नाही.  एनडीआरएफ पथक दाखल झाल्यानंतर सिद्धू घाडगे आणि मंगेश मोरे या दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलंय. तर इतर दोन कामगारांचे नाव तानाजी घोडके आणि आबा घोडके असं आहे. 

दरम्यान, काल रात्री उशिरा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे घटनास्थळी पोहोचले होते. रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करत ते रात्री उशिरापर्यंत थांबले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेएन, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मृत मजुराच्या कुटुंबीयांना पाच लाखाची तातडीची मदत जाहीर केलीय.

नेमकं काय घडलं?

आंबेगावमधील श्रीनिवास शिंदे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते, त्यावेळीही दुर्घटना घडली. विहिरीचे काम जवळपास पूर्ण झालं होतं. आतील मोजमाप घेण्यासाठी चार मजूर खाली उतरले होते. मात्र काळा आला होता. विहिरीच्या काठ्यावर असलेल्या मातीचा ढिगाऱ्याचा सगळा भाग अचानक विहिरीत कोसळला आणि या सर्व ढिगार्‍याखाली हे चार मजूर अडकले. दुर्दैवाने या दुर्घटनेत त्यांच्या मृत्यू झाला आहे.

यानंतर पोकलेन मागून बचाव कार्य सुरू करण्यात आले मात्र विहिरीत पडलेला दगड मातीचा ढिगारा हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना वाचविण्यात अपयश आलं.पंढरपूर तहसीलदार आणि पंढरपूर तालुका पोलीस यांनी माती आणि दगडाचा ढिगारा काढण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ पथकाला बोलवले होतं. एनडीआरएफ येण्यापूरर्वी  पोकलेनच्या माध्यमातून विहिरीतील पडलेला ढिगारा काढण्याचे काम करण्यात आलं. पण चार मजुरांना वाचवता आलं नाही. दरम्यान या विहिरीचे काम 15 दिवसापासून सुरू होते. अचानक दगड निसटले अचानक सगळा ढिगारा खाली पडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Accident
Pune
Solapur