वंदे भारत एक्स्प्रेससंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर स्लीपर ट्रेनमधील मेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेससंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर स्लीपर ट्रेनमधील मेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.
1/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) वंदे भारत स्लीपर ट्रेनबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एक छोटा मेन्यू लागू केला गेला आहे.
2/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
हा निर्णय घेण्यामागील कारण IRCTC ने सांगितलं की, यानिर्णयामुळे कमी पर्याय ठेवल्यामुळे जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवर अधिक भर देता येईल.
3/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
त्या तीन वंदे भारत ट्रेनमध्ये हा निर्णय मुंबई-बंगळूर, हावडा-कामाख्या (गुवाहाटी) आणि नवी दिल्ली-वाराणसी याबद्दल घेण्यात आला आहे.
4/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
या ट्रेनमध्ये पूर्वी नाश्तात सूप, अंड्याचे ऑम्लेट, ऑम्लेट सँडविच, व्हेज सँडविच, ताक आणि चॉकलेट देण्यात यायचं. तर आता इडली-वडा, पोहे किंवा उपमा यापैकी एक पर्याय प्रवाशांना घेता येणार आहे. शिवाय इडली, वड्यासोबत सांबार आणि चटणी देखील देण्यात येईल.
5/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचे मेनू देखील बदलण्यात आला आहे. चपाती, भात, डाळ आणि मुख्य पदार्थ किंवा भाजी देण्यात येणार आहे. पूर्वी सुक्या भाज्या, दही, सॅलड, लोणची आणि मिठाई हे देण्यात येतं होतं.
6/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
वंदे भारत स्लीपरमधून प्रवाशांना व्हेज किंवा नॉन व्हेज असा पर्याय निवडता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मेन्यूमधील फक्त पदार्थ कमी केले नाही, तर जेवणाचे वजनही कमी केलंय.
7/8
वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल महत्त्वाची बातमी!
पूर्वी एक्स्प्रेसमधील जेवणाचे वजन हे साधारण 700 ते 750 ग्रॅम होतं. पण आता ते 450 ते 500 ग्रॅम असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जेवण हवं की नको हे तिकीट बुकिंग करताना निवडावे लागते.
8/8
तिकीट शुल्कात काही कपात होणार आहे का?
आता प्रवाशांना प्रश्न पडला आहे की, पदार्थ कमी केले आणि जेवणाचे वजनही कमी केलंय, तर तिकीट शुल्कात काही कपात होणार आहे का?