SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2026 : कन्या आणि मकर राशीसह या लोकांसाठी प्रगतीचा दिवस, या लोकांना आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी

Aajche Rashi Bhavishya 25 November 2026 : आजचा दिवस काही लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असणार आहे. तर असा हा आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 06:42 IST | Updated: Nov 25, 2026, 06:44 IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 25 November
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 25 November 2026 in Marathi : आज कार्तिक कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. तर बुधवार हा गणपतीची आराधना करण्याचा दिवस आहे. पंचांगानुसार आज शिवयोग आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस छान असणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी छुपा शत्रूंपासून सावध राहा. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. काही कां तुम्हाला सहजपणे पूर्ण करता येणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

आज तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या कामासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. तुमची शांतता हाताळण्याचा प्रयत्न करा. अडचणींवर मात करणार आहात. जुनी देणी फेडू शकणार आहात.


मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मनातील कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. लोकांसाठी हा दिवस फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक संबंध चांगले असणार आहे. शैक्षणिक गोष्टींमध्ये रस वाढणार आहे.

 

कर्क (Cancer Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तुमच्या भावंडांसोबत एखाद्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. अनावश्यक वाद टाळा. नवीन संधीवर काम करा.


सिंह (Leo Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे. अनेक सकारात्मक भावनांचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार आहे. विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागणार आहे.

 

कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन भेट घेऊन आलाय. करिअरममध्ये चांगली बातमी कानावर पडणार आहे. आरोग्य छान राहणार आहे. जोडीदारासोबत प्रवासाचे प्लॅन करणार आहात.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुम्हाला अनेक फायदा आज मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक बदल पाहिला मिळणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करणार आहात.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण क्षण घेऊन आला आहे. कौटुंबिक वातावरण सुखद असणार आहे. तुमची कामं सोपी होणार आहे. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडणार आहे. तुमच्या मेहनतीवर पालक आनंदी असणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याकडून मदत मिळणार आहे. कामात प्रगती तर समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करणार आहात.  


मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. नवीन लोकांशी संपर्क तुमच्यासाठी भविष्यातील गोष्टींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. पूर्वी केलेल्या कामांचे चांगले परिणाम दिसणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी जरा कठीण असणार आहे. कोणत्याही मोठ्या समस्येवर तडजोडीसाठी तयार राहा. कामात यश मिळेल, पण मन अस्वस्थ असणार आहे. तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट वाटणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES