आजचे राशीभविष्य 6 नोव्हेंबर 2026 : आज धनत्रयोदशी! 5 राशींना धनलाभ, तर या लोकांचे जोडीदारासोबत वाद होण्याचे संकेत
Aajche Rashi Bhavishya 6 November 2026 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 6 November 2026 in Marathi : आज धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस. आज धन्वंतरी देवता, कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करण्यात येते. आज खूप चांगला योगायोग जुळून आला आहे. हा शुक्रवारमधील शुक्र आणि 6 तारीख म्हणजे शुक्राचा कारक, शुक्र हा संपत्तीचा कारक मानला जातो. त्यासोबत जुळून आलेला योगायोग म्हणजे धनत्रयोदशीचा योग...असा हा दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी कसा असणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं सोनं होणार आहे. तुमच्यामधील सकारात्मक पुढाकार नात्यात गोडवा आणेल. जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी प्लनिंग करणार आहात.
वृषभ (Taurus Zodiac)
आजन नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. बँक बॅलेन्स भक्कम होणार आहे. नात्यात भावनिक निर्णय घ्यावा लागणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. कामाचे ठिकाण असो किंवा घरात वातावरण सुखद असणार आहे. दिवाळीमुळे आर्थिक बजेट थोडं कमी जास्त होणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
तुमच्यावर आज महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. पैसे उधार देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. जोडीदारासोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. धनत्रयोदशी असल्याने आज जरा खरेदीवर मर्यादा ठेवा. नात्यांमध्ये ठाम भूमिका मांडणे हिताचे ठरणार आहे.
हेसुद्धा वाचा - Dhantrayodashi Wishes in Marathi : लक्ष्मीचा वास, आरोग्याची साथ...! धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या सोनेरी शुभेच्छा
कन्या (Virgo Zodiac)
तुमच्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. नात्यातील जबाबदाऱ्या संतुलन करणार आहोत. जोडीदारासोबत क्षुल्लक बाबींवरून होणारे वाद वाढचे संकेत आहेत.
तूळ (Libra Zodiac)
कामाच्या ठिकाणी गैरसमजाला बळी पडू नका. आर्थिक किंवा जबाबदाऱ्यांशी संबंधित गोष्टीत उत्तम असणार आहे. कोणाच्यातरी भावनिक वागणुकीवर आधारित घाईचे निर्णय तुम्हाला महागात पडू शकतात.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
कामाच्या ठिकाणी अचानक नवीन संधी चालून येणार आहे. जोडीदाराला पुरेसा वेळ देणे कठीण होणार आहे. आर्थिक स्थिती आज अचानक एका क्षणिक निर्णयाने बदलणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कारण कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होणार आहे. नात्यांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटून घ्या. प्रेम जीवनात सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. जोडीदारासोबतचे पूर्वीचे अंतर कमी होण्यास मदत मिळणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी बोलताना कठोर भाषा टाळा. नात्यातील एखादा गैरसमज समोर येणार आहे. कुटुंबातील सदस्याचे शब्द तुम्हाला कठोर वाटणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस प्राधान्यक्रम ठरवण्याची संधी तुम्हाला देणार आहे. भूतकाळातील भावनिक अनुभवातून सावरण्याची संधी मिळणार आहे. कुटुंबाची एखादी छोटी इच्छा पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)