Monthly Numerology October 2026 : पैसा..नोकरी..नातेसंबंध..प्रेम..? नवरात्र, दसराच्या ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा?
Monthly Numerology Prediction October 2026 in Marathi : पितृपक्ष, नवरात्र आणि दसराचा हा महिना अकंशास्त्रानुसार मूलांक 1 ते 9 लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.
Monthly Numerology Prediction October 2026 in Marathi : २०२६ चा दहावा महिना खूप खास असणार आहे. २०२६ साठीचा अंक १ आणि ऑक्टोबरसाठीचा अंक १, हा सूर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे, या महिन्यात सूर्याचा प्रभाव सर्वाधिक असणार आहे. यामुळे आत्मविश्वास, धैर्य आणि शौर्यामध्ये वाढ पाहिला मिळणार आहे. अकंशास्त्रानुसार करिअर, आर्थिक, कुटुंब अन् प्रेमासाठी ऑक्टोबरचा हा महिना तुमच्यासाठी जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
मूलांक 1 (1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)
तुम्हाला या महिन्यात अनेक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुमच्यामधील सकारात्मक ऊर्जा द्विगुणीत वाढणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्यामधील क्षमतांची जाणीव होणार आहे. त्यामुळे तुमच्यामधील सुधारणेला वाव असणार आहे. यशाचे अनेक मार्ग खुले होणार आहे, ज्यामुळे तुमच्यामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे.
मूलांक 2 (2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
या लोकांसाठी ऑक्टोबर महिना नवीन उत्साह आणि आनंद घेऊन आला आहे. कुटुंबातील चालू असलेले वाद किंवा भांडणे मिटणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. नातेसंबंध गोड राहणार आहे. तुम्ही नवीन लोकांशी नव्याने जोडले जाणार आहात. यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायाला महत्त्वपूर्ण लाभ मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात.
मूलांक 3 (3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी हा आठवडा प्रभावशाली सिद्ध होणार आहे. तुमच्यामधील क्षमता दाखवण्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे. तुमचे संवाद कौशल्य आणि भाषण प्रभावी असणार आहे. लोकांवर तुमच्या शब्दांचा परिणाम होणार आहे. तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहात. समाजात तुमचा आदर वाढणार आहे. व्यवसायात नफा प्राप्त होईल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
मूलांक 4 (4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
या मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या कष्टाचे आणि मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुमच्या कामाची या महिन्यात प्रशंसा होणार आहे. पदोन्नती आणि मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडणार आहे. या महिन्यात रखडलेल्या कामांना वेग मिळणार आहे.
मूलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना अतिशय उत्तम आणि सकारात्मक असणार आहे. व्यवसायात लक्षणीय फायदा होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. आयात-निर्यात व्यापारातूनही चांगली कमाई होणार आहे. तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. तुमचा सामाजिक दर्जा वाढणार आहे. काही महत्त्वाच्या लोकांची भेटीगाठी होणार आहे. चांगली बातमी किंवा चांगली संधी घेऊन हा महिना आला आहे.
मूलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी हा महिना अतिशय खास असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. सहकारी आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला परीपूर्ण करणार आहे. यामुळे घर आणि नोकरी दोन्ही सांभाळण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नवीन घर किंव वाहन खरेदी तुमच्यासाठी शुभ संयोग घेऊन आला आहे. मीडिया, लक्झरी, रिअल इस्टेट आणि सरकारी प्रकल्पांमध्ये गुंतलेल्यांना या महिन्यात सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडणार आहे.
मूलांक 7 (7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)
हा महिना नवीन आणि महत्त्वाच्या कल्पनांनी भरलेला असणार आहे. तुम्ही भविष्याबद्दल अनेक महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घेणार आहात. तुमच्या बौद्धिक क्षमतेतही वाढ पाहिला मिळणार आहे. तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाणार आहे. नवीन उपक्रमाची तुम्ही सुरुवात करणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी अनेक नवीन प्रकल्प या महिन्यात वाट पाहत आहेत.
मूलांक 8 (8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)
आपली ध्येये साध्य करण्यासाठी हा आठवडा यशस्वी ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात. तुमच्यामधील कलागुणांना वाव मिळणार आहे. तुमचा अध्यात्माकडे कल वाढणार आहे. अनेक ठिकाणी प्रवास वाढणार आहे. तुम्हाला भौतिक सुखसोयीसाठी हा महिना उत्तम ठरणार आहे. तुमच्या शब्दांना या महिन्यात मान मिळणार आहे.
मूलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)
हा महिन्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. घाईने निर्णय मात्र या महिन्यात घेऊ नका. शिवाय कोणतेही पाऊल घाईने घेऊ नका. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळणार आहे. पदोन्नतीची चांगली संधी चालून आली आहे. कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळणार असून यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. दानधर्म करणे या महिन्यात फलदायी ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)