SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये कोण कोणाशी लढणार? वाचा सेमीफायनल सामन्यांच्या तारखा आणि वेळ...

मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये सेमीफायनलमध्ये खेळणारे चार संघ ठरले आहेत, आशिया कपमध्ये कोणता सेमीफायनलचा सामना कधी आणि कोणत्या वेळेला होणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 25, 2026, 11:01 IST | Updated: Nov 25, 2026, 11:20 IST
Image Credit: मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील सेमीफायनलचे वेळापत्रक
Join

मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे, मागील काही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये चाहत्यांना मनोरंजक सामने पाहायला मिळाले. भारताच्या संघाला पाकिस्तानने पराभूत केले तर पहिल्या गटामधील बांग्लादेशने देखील एक सामना गमावला आहे. भारताच्या संघाने यूएईच्या संघाला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे आणि पाकिस्तानच्या संघाने ग्रुप स्टेजचा एकही सामना न गमावता पाकिस्तानचा संघ अपराजित सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. ग्रुप अ मधील श्रीलंकेचा अ संघ हा अपराजित सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आहे. मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये सेमीफायनलचे सामन्याचे वेळापत्रक सविस्तर वाचा.

सेमीफायनलच्या सामन्याचे आयोजन

पहिल्या गटामधील अव्वल स्थानावर असलेल्या श्रीलंका अ संघाचा सामना हा दुसऱ्या गटामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत अ संघाशी होणार आहे. तर पहिल्या गटामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांग्लादेश अ संघाचा सामना हा दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तान अ संघाशी होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना हा भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणार आहे. पहिल्या सामन्याचे आयोजन हे 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना हा पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ यांच्यामध्ये रंगणार आहे. पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ यांच्यामध्ये होणारा सामना हा 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा

UAE विरुद्ध सामन्याआधी 'या' दिग्गजाकडून वैभव सूर्यवंशीने घेतल्या टिप्स! पहा Video

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला सेमीफायनल सामना - 26 नोव्हेंबर 2026 - भारत अ विरुद्ध श्रीलंका अ - भारतीय प्रमाण वेळेनुसार 3.30 वाजता
दुसरा सेमीफायनल सामना - 27 नोव्हेंबर 2026 - पाकिस्तान अ विरुद्ध बांग्लादेश अ - भारतीय प्रमाण वेळेनुसार 3.30 वाजता

सेमीफायनलमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये विजयी संघ अंतिम सामना खेळतील. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES