SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शुक्रवारी एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी, मोना अग्रवालने केला वर्ल्ड रेकॉर्ड

Asian Para Games 2026 : एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये शुक्रवारचा दिवस भारतासाठी खूप खास ठरला. यात भारतीय खेळाडूंनी जवळपास 4 सुवर्णपदक जिंकली आहेत. यात भारताची शुटर मोना अग्रवाल हिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवत अभिमानास्पद कामगिरी केली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 23, 2026, 02:41 PM IST | Updated: Oct 23, 2026, 03:13 PM IST
Image Credit: शुक्रवारी एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी, मोना अग्रवालने केला वर्ल्ड रेकॉर्ड
Join

 Asian Para Games 2026: जपानमध्ये एशियन पॅरा गेम्स 2026 ही स्पर्धा सुरु असून यात भारताची शुटर मोना अग्रवाल हिने जबरदस्त प्रदर्शन करून पुन्हा एकदा देशाचं नाव मोठं केलं आहे. एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये तिने असा निशाणा लगावला की वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला आणि भारताच्या खात्यात अजून एक सुवर्णपदक आलं. महिलांच्या 50 मीटर राइफल थ्री पोजिशंस एसएच1 स्पर्धेत विजयासोबत मोनाने या खेळांमध्ये दुसरं सुवर्णपदक जिंकलं आहे.

मोना अग्रवालने ब्रेक केला वर्ड रेकॉर्ड :

मोना अग्रवालने शुक्रवारी फायनल सामन्यात 357.5 पॉईंट्स मिळवले. या गुणांसह तिने स्वीडनच्या ॲना बेन्सनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. बेन्सनने जुलै 2026 मध्ये सर्बियातील नोवी साद येथे 356 गुण मिळवून हा विक्रम प्रस्थापित केला होता. मोनाने तिला मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. मोनाचे यश इथेच थांबले नाही. तिने या स्पर्धेत एशियन गेम्समधील रेकॉर्ड सुद्धा मोडीत काढला. याआधीचा रेकॉर्ड दक्षिण कोरियाच्या ली युन-री हिच्या नावावर होता, जिने सप्टेंबर 2026 मध्ये चांगवॉन येथे 355.7 गुण मिळवले होते. मोनाने 357.5 गुणांची नोंद करत हा रेकॉर्ड मागे टाकला. अशा प्रकारे तिने एकाच स्पर्धेत जागतिक आणि एशियन गेम्समध्ये दोन्ही रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

शुक्रवारी सुवर्णपदकांचा वर्षाव :

एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी जवळपास 3 सुवर्णपदक भारतीय खेळाडूंनी पटकावली. यामध्ये खालीलपैकी खेळाडूंचा समावेश होता.

पॅरा आर्चरी: हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांनी चीनचा 5-1 असा पराभव करून रिकर्व्ह पुरुष दुहेरी प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

पॅरा बॅडमिंटन: नितेश कुमारने प्रमोद भगतचा पराभव करून पुरुष एकेरी SL3 गटात विजय मिळवला, नवीन शिवकुमारने फ्रेडी सेतियावानचा पराभव करून पुरुष एकेरी SL4 गटात बाजी मारली, तर थुलसिमथी मुरुगेसन आणि मानसी जोशी यांच्या जोडीने महिला दुहेरी SL3-SU5 गटात विजय मिळवला.

पॅरा ॲथलेटिक्स: संदीपने 52.28 सेकंदांच्या वर्ल्ड रेकॉर्ड सह पुरुषांच्या 400 मीटर (T64) शर्यतीत विजय मिळवला. तर हॅनीने 60.49 मीटरच्या जागतिक विक्रमासह पुरुषांच्या भालाफेक (F37/38) प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

पॅरा नेमबाजी: मोना अग्रवालने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पी एसएच 1 (50m Rifle 3P SH1) प्रकारात 357.5 गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड करत  सुवर्णपदक पटकावले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES