SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

स्टार क्रिकेटरवर बंदीची कारवाई, 'हे' औषध घेणं पडलं महागात, बोर्डाने दिली मोठी शिक्षा

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली आहे. स्टार क्रिकेटरने ही शिक्षा स्वीकारली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने ही मोठी शिक्षा ठोठावली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 22, 2026, 01:09 PM IST | Updated: Oct 22, 2026, 01:45 PM IST
Image Credit: स्टार क्रिकेटरवर बंदीची कारवाई, 'हे' औषध घेणं पडलं महागात, बोर्डाने दिली मोठी शिक्षा
Join

Cricket News : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट खेळातील काही नियम हे खूपच सक्तीने पाळले जातात. जो खेळाडू हे नियम पाळत नाहीत अशांवर दंडात्मक किंवा बंदीची कारवाई केली जाते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांच्या एका स्टार महिला क्रिकेटरवर अशीच कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा विज्ञान आणि क्रीडा वैद्यक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यामुळे करण्यात आली आहे. हे प्रकरण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्या जाणाऱ्या औषधांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याशी संबंधित आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं :

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं. यात त्यांनी स्पष्ट केलं की मेगन शटद्वारे करण्यात आलेलं नियमांचं उल्लंघन प्रतिस्पर्धात्मक सत्राच्या बाहेर होतं. सोबतच बोर्डाने हे सुद्धा स्पष्ट केलं की या औषधाच्या सेवनाचं उद्दिष्ट हे काही खेळाचे प्रदर्शन वाढवणं नव्हतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शटला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे आणि खेळाडूंना त्यांच्या जबाबदाऱ्या समजतील याची खात्री करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे.

हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सीरिजला आजपासून सुरुवात, कधी अन् कुठे पाहाल सामने?

दोन सामन्यांची बंदी :

ऑस्ट्रेलियाची महिला गोलंदाज मेगन शट हिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातल्यामुळे याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय आणि घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांवर पडणार आहे. 33 वर्षीय ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॉर्थ सिडनी ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. याव्यतिरिक्त ती वुमेन्स बिग बॅश लीग 2026 मध्ये ॲडलेड स्ट्रायकर्सच्या पहिल्या सामन्यातही खेळू शकणार नाही. हा सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्न स्टार्स विरुद्ध होणार आहे.

मेगन शटने चूक कबूल केली :

गोलंदाज मेगन शट हिने आपल्या चुकीबद्दल कोणतेही कारण न देता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेली शिक्षा पूर्णपणे स्वीकारली आहे. आपल्या चुकीबद्दल मनापासून खेद व्यक्त करत तिने आपल्या संघातील खेळाडूंची, बोर्डाची आणि चाहत्यांची माफी मागितली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES