रोहित आणि विराटचं भविष्य 'या' 2 गोष्टी ठरवणार, BCCI ने वर्ल्ड कप खेळण्यासाठी ठेवली अट
BCCI On ODI World Cup 2026 : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजांना वनडे वर्ल्ड कप 2027 खेळताना पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र या दोन दिग्गजांना वर्ल्ड कप खेळण्यासाठी काही अटींची पूर्तता सुद्धा कारवी लागणार आहे.
BCCI On ODI World Cup 2026 : वनडे वर्ल्ड कप 2027 साठी अद्याप जवळपास 1 वर्षाचा कालावधी आहे. मात्र भारतीय संघात कोण कोण असणार याची चर्चा मात्र सुरु झालेली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजांना वनडे वर्ल्ड कप 2027 खेळताना पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तसेच रोहित आणि विराट हे दोघे सुद्धा हा वर्ल्ड कप खेळण्यासाठी उत्सुक आहेत. विराटने तर जाहीर केली की हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये आगामी वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे. मात्र वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंना काही अटी सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास काय म्हणाले?
स्पोर्टस्टारशी बोलताना एका विशेष संभाषणात बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी असे मत व्यक्त केले की, 'भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूची पात्रता ही वयापेक्षा त्याच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीच्या आधारावर ठरवली जावी. अर्थात त्यांनी हेही स्पष्ट केले की निवडीशी संबंधित बाबी त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. ते काम सिलेक्टर्सचे आहे'.
मिथुन मन्हास म्हणाले की, 'बीसीसीआयच्या बाबतीत सांगायचे तर, मी यावर भाष्य करू शकत नाही कारण हा सर्वस्वी निवड समिती आणि प्रशिक्षकांचा निर्णय असतो. तरीही, माझ्या मते खेळाडूची निवड ही वयावर नव्हे, तर त्याची तंदुरुस्ती आणि कामगिरी यांवर आधारित असावी. जर एखादा खेळाडू खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल, देशासाठी चांगली कामगिरी करत असेल आणि सामने जिंकून देत असेल, तर केवळ याच गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे'.
रोहित शर्माला जर वर्ल्ड कप 2027 मध्ये निवडलं जात तर तो तेव्हा 40 वर्षांचा असेल आणि भारताकडून वर्ल्ड कप खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल. तर विराट कोहलीचं वय हे 38 वर्ष असेल. दरम्यान, यशस्वी जयस्वाल सारखे युवा खेळाडूही आपल्या संधीची वाट पाहत आहेत. आता सर्वस्वी निर्णय बीसीसीआयच्या हातात आहे. वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये समतोल राखण्यासाठी भारतीय निवड समितीने एक विशेष योजना आखली आहे.