SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने या खेळाडूंवर फोडले खापर..!

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने 7 विकेट्स गमावून 259 धावा 20 ओव्हरमध्ये केल्या. या सामन्याच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराने मोठे विधान केले आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 30, 2026, 08:19 PM IST | Updated: Oct 30, 2026, 08:26 PM IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा आज चौथा सामना आज पार पडला, या सामन्यामध्ये न्यूझीलंड दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे गोलंदाज पूर्णपणे फेल झाले, त्यामुळे पहिल्याच डावामध्ये भारताचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा या सामन्यामध्ये निर्णय घेतला होता, हा निर्णय भारताच्या संघाला चांगलाच महागात पडला. या सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने 7 विकेट्स गमावून 259 धावा 20 ओव्हरमध्ये केल्या. या सामन्याच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराने मोठे विधान केले आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी केली यामध्ये त्यांनी 20 ओव्हरमध्ये 259 धावा केल्या, भारताच्या संघाला हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये 172 धावाचं करु शकले नाहीत. भारताच्या संघाने पहिल्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी राहिली. या सामन्यात झालेल्या टीम इंडियाच्या पराभवानंतर भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या कामगिरीवर नाराज दिसला. श्रेयसने भारताच्या पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले आणि सांगितले की, न्यूझीलंड संघाने फलंदाजीच्या पॉवरप्लेमध्ये सामना आपल्या बाजूने वळवला होता.

हे ही वाचा

6,6,6,6,6,6,6,6,6,6... ग्लेन फिलिप्सचे दमदार शतक! नवा रेकॅार्ड केला नावावर

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्याने या पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले आहे. त्याच्या मते, फलंदाजीच्या पॉवरप्लेमध्ये सामना हातातून निसटला. तो म्हणाला, "मला वाटते की सुरुवातीला आमची गोलंदाजी चांगली नव्हती. पॉवरप्लेमध्ये, विशेषतः तिसऱ्या षटकात, आम्ही लय पकडली. काही गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण ग्लेन फिलिप्सने एक अपवादात्मक खेळी केली. त्याने काही जोरदार फटके मारले, जे खरोखरच नेत्रदीपक आणि पाहण्यासारखे होते." तो पुढे म्हणाला, "मला वाटते की मागे वळून आपल्या चुका समजून घेणे आणि पुनरागमन कसे करायचे हे ठरवणे महत्त्वाचे आहे."

शेवटचा सामना कधी होणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा टी20 मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना हा १ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामना भारताच्या संघाने जिंकला तर मालिका टीम इंडिया एकतर्फी जिंकेल. आता भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES