• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर

रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर

दररोज अंडी खाल्ल्याने त्याचे तोटे देखील आहेत. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की दररोज अंडी खाल्ल्यामुळे र्करोगाचा धोकाही वाढू शकतो? यासंदर्भात डॅाक्टर काय म्हणतात यासंदर्भात वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 30, 2026, 10:10 PM IST|Updated: Oct 30, 2026, 10:43 PM IST
joinshare
रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एल निनोनंतर लगेच ला निना येणार? जगाच्या हवामानात मोठ्या बदलांची शक्यता; भारताच्या मान्सूनवर काय परिणाम?

एल निनोनंतर लगेच ला निना येणार? जगाच्या हवामानात मोठ्या बदलांची शक्यता; भारताच्या मान्सूनवर काय परिणाम?

2

'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

3

रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर

4

₹10 आणि ₹20 च्या नोटासंदर्भात RBI चा मोठा प्लॅन; तुमच्यावर काय परिणाम? आताच घ्या जाणून!

5

श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा रेकॅार्ड, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

व्यायाम शाळेत कसरत करणाऱ्या अनेकांना सल्ला दिला जातो की आरोग्यासाठी अंडी खाणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. वेगवेगळे जीम ट्रेनर त्यांच्या विद्यार्थांना वेगवेगळे सल्ले देत असतात, अंड्यांमध्ये  प्रथिनांसोबतच, त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे स्नायू मजबूत करण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अंडी खाणे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आपल्या आहारामध्ये पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? दररोज अंडी खाल्ल्याने त्याचे तोटे देखील आहेत. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की दररोज अंडी खाल्ल्यामुळे र्करोगाचा धोकाही वाढू शकतो?

कॅन्सर हीलर सेंटरमधील तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ यासंदर्भात शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी अंडी खाताना ती कुठून येतात आणि त्यांची गुणवत्ता काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य संघटनाच्या एका अहवालानुसार, अंडी खाणे आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू यांच्यात संबंध आढळून आला आहे. तथापि, अंड्यांमुळे कर्करोगाचा धोका केव्हा वाढू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

हे ही वाचा

तुमचं मूल माती किंवा भिंतीचा प्लास्टर खातंय? मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

आरोग्यतज्ञांच्या मते, अंड्यांची गुणवत्ता आणि अंड्यांचा स्रोत यावर अवलंबून अंडी खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो. तथापि, अंडी आणि कॅन्सर यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी विविध अभ्यास केले आहेत. काही अभ्यासांनी लोकांच्या आहाराच्या सवयींनाही एक कारणीभूत घटक म्हणून दर्शवले आहे. तथापि, जर तुम्ही एका प्रतिष्ठित स्रोताकडून अंडी खरेदी केली, तर तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही, कारण अंडी प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहेत.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Dr Tarang Krishna (@cancerhealingcoach)

दररोज अंडी खाल्ल्याने कॅन्सर होत नाही, कारण ती प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. तथापि, खराब झालेली किंवा भेसळयुक्त अंडी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. पण, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने अंडी खाऊ नयेत. अंड्यांचे योग्य प्रमाण व्यक्तीचे वय, आहार आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींवर अवलंबून असू शकते. कोलेस्ट्रॉल, हृदयरोग किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी आपल्या आहाराबाबत डॉक्टर किंवा पात्र आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा. 

अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Lifestyle News
Marathi News