लहान मुले जेव्हा जमीनीवर खेळत असतात त्यावेळी अनेक लहान मुलांना चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना आपण पाहतो. अशावेळी जर तुम्ही त्या लहान मुलाचे पालक असाल तर मग बऱ्याचदा तुम्हाला या समस्येवर काहीही उपाय सुचत नाही आणि त्यामुळे मग चिंता देखील वाटत असते. अनेक पालक हे अनेकदा लहान मुलाची खोडी किंवा सामान्य सवय म्हणून देखील त्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण जर तुमचं मुल हे वारंवार करत असेल तर गांभिर्याने घेण्यासाठी बाब आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नये.
अनेक लहान मुले चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना दिसत असतील त्याकडे दुर्लक्ष न करता या सवयींकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. असे तुमचे मुल सातत्याने करत असेल तर मुलांना पोटात जंत किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. कधीकधी, हे पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा 'पिका' नावाच्या स्थितीमुळे असू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला ओरडण्याऐवजी, प्रेम आणि समजूतदारपणाने ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी केवळ औषधोपचाराचा आधार घेऊ नये; त्याऐवजी, ही सवय कमी करण्यासाठी काही युक्त्या अवलंबल्या जाऊ शकतात.
हे ही वाचा