• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहने आपला शिष्य अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांना लवकरात लवकर वनडे संघात खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युवराजचं म्हणणं आहे की या प्रतिभावान खेळाडूंना योग्य संधी मिळायला हव्यात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 30, 2026, 10:27 PM IST|Updated: Oct 30, 2026, 10:59 PM IST
joinshare
'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला
Image Credit: 'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एल निनोनंतर लगेच ला निना येणार? जगाच्या हवामानात मोठ्या बदलांची शक्यता; भारताच्या मान्सूनवर काय परिणाम?

एल निनोनंतर लगेच ला निना येणार? जगाच्या हवामानात मोठ्या बदलांची शक्यता; भारताच्या मान्सूनवर काय परिणाम?

2

'वैभव आणि अभिषेक शर्माला वनडेत संधी द्या', माजी क्रिकेटर युवराज सिंगने दिला सिलेक्टर्सला सल्ला

3

रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर

4

₹10 आणि ₹20 च्या नोटासंदर्भात RBI चा मोठा प्लॅन; तुमच्यावर काय परिणाम? आताच घ्या जाणून!

5

श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा रेकॅार्ड, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने एक महत्वाचं विधान करून बीसीसीआय सिलेक्टरचं लक्ष वेधून घेतलं आहे. युवराज सिंहच्याच्या मते, जर भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथला आणि तरुण प्रतिभेला योग्य न्याय द्यायचा असेल, तर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीसारख्या प्रतिभावान खेळाडूंना लवकरात लवकर वनडे  संघात समाविष्ट केले पाहिजे. या चर्चेदरम्यान त्याने विकेटकिपर ईशान किशनचाही उल्लेख केला.

 काय म्हणाला युवराज सिंग? 

पीटीआयशी बोलताना युवराज सिंगने अभिषेक शर्माला वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी युवराज म्हणाला की त्याने ठामपणे सांगितले की, जर अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंची 50 ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी निवड होत नसेल, तर एका अर्थाने आपण देशातील प्रतिभेला न्याय देण्यात अपयशी ठरत आहोत. याच सोबत युवराज सिंहने असं देखील सांगितलं की, संघात आधीच अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत, ज्यामुळे कोणालाही अंतिम अकरा जणांच्या संघात किंवा 15 सदस्यांच्या संघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. तरीही त्यांच्या अलीकडील कामगिरीचा विचार करता, या तरुण खेळाडूंना लवकरात लवकर संघात समावेश करून घेणे आवश्यक आहे.

अभिषेक शर्मा हा टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला आयसीसी नंबर 1 स्थानावर आहे.  तो गेल्या काही वर्षांपासून या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. असे असूनही तो केवळ एकाच फॉरमॅटपुरता मर्यादित राहिल्याचे दिसते आणि  वनडे किंवा टेस्ट संघात स्थान मिळवण्यापासून तो अजूनही बराच दूर आहे. दुसरीकडे वैभव सूर्यवंशी ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अगदी लहान वयातच खळबळ उडवून दिली होती. त्याच्यासाठीही T20 संघात स्थान मिळवणे सोपे राहिलेले नाही. इंग्लंड विरुद्ध त्याचं भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज वेळापत्रक :

पहिला सामना : 4 नोव्हेंबर 
दुसरा सामना : 7 नोव्हेंबर 
तिसरा सामना : 10 नोव्हेंबर 
चौथा सामना : 13 नोव्हेंबर 
पाचवा सामना : 15 नोव्हेंबर 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india