शाहरुख खानचा शेजारी झाला सूर्यकुमार यादव, दुबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
Suryakumar Yadav Dubai Home : टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने दुबईत नवं घर खरेदी केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात सूर्याने दुबईत घर का खरेदी केलं हे सुद्धा सांगितलं आहे.
Suryakumar Yadav Dubai Home : भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने यंदाचा टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवकडून भारतीय संघाचं नेतृत्व सुद्धा काढून घेण्यात आलं त्याला टीम इंडियात अद्याप संधी देण्यात आलेली नाही. मात्र सूर्यकुमार यादव हा अजूनही क्रिकेट खेळत असून त्याने नुकतंच एका लोकल टी20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. सध्या सूर्यकुमार यादव हा चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या गुंतवणुकीमुळे. सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यात तो प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करतोय तर येवले सूर्यकुमारची पत्नी देविशा सुद्धा त्यांच्या सोबत आहे. सूर्याने डॅन्यूब प्रॉपर्टीजकडून एक घर विकत घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादवने खुलासा सुद्धा केला की त्याने दुबईत घर का घेतलं.
सूर्यकुमार यादवने सांगितले की, त्याला दुबईला यायला आवडतं. तो पहिल्यांदा 2014 च्या आयपीएलदरम्यान येथे आला होता. येथे राहताना एक वेगळ्या प्रकारची सुखद भावना जाणवत असल्याचे सूर्यकुमारने सांगितलं. तसेच सुरक्षितता हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सुद्धा सूर्या म्हणाला.
शाहरुख खानचा बनला शेजारी :
सूर्यकुमार यादवने बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या शाहरुख खानच्या बिल्डिंगजवळ त्याचं नवीन घर खरेदी केलं. डॅन्यूब ग्रुप दुबईमध्ये 'Shahrukhz Residence' नावाची इमारत बांधत आहे. सूर्याने अगदी त्याच इमारतीजवळ एक घर विकत घेतले आहे. त्याच व्हिडिओच्या शेवटी सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याबाबत काही गंमतीशीर गोष्टीही केल्या. दरम्यान सूर्यकुमारची पत्नी देविशाने नमूद केले की तिच्या सूचनेनुसार दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करून सूर्यकुमारने योग्य निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये मालमत्तेत गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सूर्यकुमार यादवच्या या दुबईतील नव्या घराची अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र याची किंमत सुमारे 2.85 ते 14 कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे.