SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी चांगला गोलंदाज नाहीये', भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियातील कमबॅकवर काय म्हणाला मोहम्मद शमी?

Mohammad Shami On Bhuvaneshwar Kumar : मोहम्मद शमी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागोपाठ चांगली कामगिरी करतोय. मात्र त्याला अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सुद्धा जवळपास 4 वर्षांनी टीम इंडियात संधी मिळालेली आहे. तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियातील कमबॅकवर मोहम्मद शमीने मीडियाला प्रतिक्रिया दिली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 12, 2026, 01:48 PM IST | Updated: Oct 12, 2026, 02:24 PM IST
Join

Mohammad Shami On Bhuvaneshwar Kumar : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास 4 वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेरच्या होता. त्याला संधी मिळत नव्हती, मात्र आगामी न्यूझीलंड विरुद्ध टी२० सीरिजसाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली आहे. तर मोहम्मद शमी सारखा दिग्गज गोलंदाज अजूनही टीम इंडियात संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. जवळपास 2 वर्षांपासून मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत आहे. पण असं असलं तरी मोहम्मद शमी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागोपाठ चांगली कामगिरी करतोय. सध्या रणजी ट्रॉफी 2026-27 मध्ये मोहम्मद शमी खेळत असून येथे तो आपल्या जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहे. मोहम्मद शमीला त्याला टीम इंडियात संधी न मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता शमी उत्तर देताना निराश दिसला आणि त्याने टोला लगावला.

कल्याणी येथे खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी 11 ऑक्टोबर रोजी मोहम्मद शमीने 17.3 ओव्हर गोलंदाजी केली, ज्यामध्ये नऊ ओव्हर मेडन होत्या. त्याच्या या कामगिरीवरून हे दिसून आलं की  तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कठोर परिश्रम घेत आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रभाव पाडण्यास सक्षम आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर पत्रकारांनी मोहम्मद शमीला त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्याने आपल्या अंदाजात उत्तर दिलं . मोहम्मद शमी म्हणाला की, 'तुम्ही माझी तंदुरुस्ती पाहू शकता, त्याबद्दल लिहा. तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवूनच आहात. मग मी काय म्हणतो याने काय फरक पडतो? मी मैदानात आहे, खेळत आहे आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे स्पर्धा करत आहे'.

मोहम्मद शमीला विचारण्यात आलं की सतत चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात संधी का मिळत नाहीये? त्यावर मोहम्मद शमी म्हणाला की, 'नाही, नाही, मी काही चांगला गोलंदाज नाही'. त्याच्या या उत्तरावरून भारतीय संघातील निवडीबाबतच्या त्याच्या नाराजीची कल्पना येते.

भुवनेश्वरच्या पुनरागमनावर काय म्हणाला शमी?

मोहम्मद शमीने एकीकडे निवड समितीबाबत निराशा व्यक्त केली तर दुसरीकडे भुवनेश्वरच्या टी20 संघातील पुनरागमनाचे स्वागत केले. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठीच्या भारतीय संघात 36 वर्षीय भुवनेश्वरने स्थान मिळवले आहे. भुवनेश्वरला भारतीय संघात खूप आधीच परत बोलावले जायला हवे होते असे शमीला वाटते. भुवनेश्वर इतरांशी फारसा संवाद साधत नाही, हे खरे असले तरी, केवळ त्या कारणास्तव त्याच्या गुणवत्तेकडे इतका काळ दुर्लक्ष केले जाऊ नये, असे मत त्याने व्यक्त केले.

मोहम्मद शमी भुवनेश्वरच्या निवडीवर म्हणाला, 'भुवीची निवड खूप आधी व्हायला हवी होती. तो कोणाशी फारसा बोलत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यातील गुणवत्तेला इतका काळ डावलले जावे. ही भुवनेश्वरसाठी चांगली गोष्ट आहे. त्याने आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि तो या संधीस पात्र आहे'. मोहम्मद शमी पुढे असे सुद्धा म्हणाला की, 'जर एखादा खेळाडू कठोर परिश्रम करत असेल आणि त्याच्यात क्षमता असेल, तर त्याला नक्कीच पुढे जाण्याची संधी मिळायला हवी'.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES