तिलक-नितीशच्या जोडीने न्यूझीलंडकडून हिसकावला विजयाचा घास, टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय
भारत न्यूझीलंड रोमांचक सामन्यात भारताच्या संघाने न्यूझीलंडचा विजयाचा घास हिसकावला आणि किवी संघाला 4 विकेट्सने पराभूत करुन 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा दुसरा रोमांचक सामना पार पडला, या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये शेवटच्या काही ओव्हरमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 4 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये मैदानावर गोलंदाजांना मदत मिळाली. या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 108 धावा केल्या. या सामन्यात आणखी ग्लेन फिलिप्सने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने संघासाठी अर्धशतक झळकावले, फिलिप्सने 43 चेंडूंमध्ये 70 धावा आणि जेकब्सने 46 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. संघात दोन बदल करण्यात आले आहेत. वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव यांना संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात याच मैदानावर झालेल्या एका रोमांचक सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केले होते.
हे ही वाचा
टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा नवा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक झेल घेणारा फील्डर
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताचे दोन्ही सलामीवीर संजू आणि अभिषेकने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण सुरुवातीचे विकेट्स भारताच्या संघाने लवकर गमावले, आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीला देखील खेळण्याची संधी मिळाली होती. पण तो आजच्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा करुन बाद झाला, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल देखील संघासाठी फार काही करु शकले नाही. त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर हे फलंदाजीला आले आणि त्यांनी संघासाठी चांगली भागीदारी केली, या सामन्यात सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि भारताने नमन धीरचा विकेट गमावला.
नमन धीरचा विकेट गेल्यानंतर तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कमालीची खेळी खेळल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने संघासाठी अर्धशतक झळकावत मॅचविनिंग खेळी खेळली. तिलक वर्माने संघासाठी 26 चेंडूमध्ये 51 नाबाद धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने 13 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये 3 गडी गमावले. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात टिम सेफर्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिचेलला बाद केले. प्रिन्स यादवने फिन ॲलनला क्लीन बोल्ड केले. ग्लेन फिलिप्स आणि जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.