भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सीरिजला आजपासून सुरुवात, कधी अन् कुठे पाहाल सामने?
IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20, वनडे आणि टेस्ट सीरिज सुद्धा होणार आहे. यापैकी 22 ऑक्टोबर पासून टी20 सीरिजला सुरुवात होणार आहे. तेव्हा याचे सामने कधी आणि कुठे पाहायला मिळणार याविषयी माहिती करून घ्या.
IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20 सीरिजला 22 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जाणार असून टी20 वर्ल्ड कप 2026 फायनलनंतर प्रथमच दोन्ही संघ पुन्हा टी20 सामन्यात समोरासमोर येतील. टी20 शिवाय दोन्ही संघात वनडे आणि टेस्ट सीरिज सुद्धा होणार आहे. तेव्हा हे सामने कुठे आणि कधी पाहता येणार याविषयी जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सीरिजचं वेळापत्रक :
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिला सामना - 22 ऑक्टोबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुसरा सामना - 24 ऑक्टोबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना - 27ऑक्टोबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना - 30 ऑक्टोबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना - 1 नोव्हेंबर
कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड पाच सामन्यांची टी20 सीरिज टेलिव्हिजनवर प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकतात. तर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अँप आणि वेबसाईटवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्स चॅनलवर सुद्धा प्रेक्षकांना हे सामने पाहता येतील. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12: 30 या वेळेत सुरु होतील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड :
दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकल्यास आतापर्यंत एकूण 31 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. 2007 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 10 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यात ख्राइस्टचर्च आणि वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत न्यूझीलंडने विजय मिळवला.याव्यतिरिक्त, 2012 मध्ये चेन्नई आणि 2016 मध्ये नागपूर येथे झालेल्या टी20 सामन्यांतही न्यूझीलंडनेच विजय मिळवला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या 31 सामन्यांपैकी 17 सामने हे भारतने तर 11 सामने न्यूझीलंडने जिंकले. तर 3 सामने हे टाय झाले तर 2 सामने अनिर्णित राहिले.
भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), टिळक वर्मा (उपकर्णधार कर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण कुमार, वरूण कुमार, अभिषेक शर्मा.