IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकले, भारतासमोर गोलंदाजीचे आव्हान! पहा दोन्ही संघाची Playing 11
भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकले. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत ए विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये इमर्जिंग आशिया कप 2026 च्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये भारतीय संघासमोर पहिले गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. या सामन्यात तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ हा मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने नेपाळला 306 धावांनी विजय मिळवला, आता पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये भारताचा संघ विजय मिळवून आशिया कपमध्ये सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्याच्या इराद्यात असेल. या सामन्यामध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत अ संघाची दमदार जोडी अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे दोघेही संघाचा डाव ओपनिंग करतीय. तर भारतीय गोलंदाजीच्या जोडीने नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती. हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांनी संघासाठी कमालीची कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर आज सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर भारताच्या फलंदाजीवर आजच्या सामन्यावर विशेष लक्ष असणार आहे.
हे ही वाचा
W,W, W, W... T20 पदार्पण सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा कोण आहे जमशेद आलम?
मागील सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी त्याचबरोबर अभिषेक शर्मा हे दोघेही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले होते पण आजच्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. आयुष बडोनी आणि रिंकू सिंग मागील सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाला होता, त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. मागील सामन्यामध्ये भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने संघासाठी शतकीय खेळी खेळली होती. तर कुमार कुशाग्रने त्याच्या शतकीय खेळीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
भारत ए – अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, रिंकू सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, हर्षित राणा आणि प्रिंस यादव.
पाकिस्तान ए – शमील हुसैन, फरहान यूसुफ, अब्दुल समद (कर्णधार), अली रजा, हसन नवाज, माज सदाकत, रोहेल नजीर (विकेटकीपर), मोहम्मद इमरान रंधावा, अहमद दानियाल, सुफियान मोकिम आणि साद मसूद.