पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर यूएईविरुद्ध सामन्यात भारतीय प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल! कोण IN, कोण OUT?
भारताच्या संघाने यूएईविरुद्ध सामन्यामध्ये मोठे काही बदल केले आहेत. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये कोणते बदल केले आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध यूएई यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये भारताच्या संघासाठी विजय अनिवार्य असणार आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करेल. या सामन्यामध्ये यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध मोठा धक्का मिळाला, त्यामुळे संघाला आता उपांत्य फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी यूएईविरुद्ध सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये मोठे काही बदल केले आहेत. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये कोणते बदल केले आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध यूएई यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये यूएईने नाणेफेक जिंकले आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताच्या संघाने यूएईविरुद्ध सामन्यामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भारताच्या संघाने तिसऱ्या क्रमांकावर मोठा बदल केला आहे, मागील दोन सामन्यामध्ये फेल झालेला आयुष बडोनीने संघासाठी खुपच निराशाजनक कामगिरी केली होती त्याला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले आहे आता त्याच्या जागेवर प्रभसिमरण सिंगला भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर विप्रज निगमला देखील आजच्या सामन्यामधून प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले आहे.
हे ही वाचा
निवृत्तीनंतरही धोनीच CSK चा बॉस? टीममध्ये कोण IN, कोण OUT... तोच ठरवणार?
विप्रज निगमच्या जागेवर आजच्या सामन्यामध्ये हर्ष दुबेला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. तर भारतीय संघामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजेच पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये सर्वात महागडा ठरलेल्या गोलंदाजाला बाहेर न करता प्रिन्स यादवला प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात आले आहे त्याच्या जागेवर अरशद खानला संघात जागा मिळाली आहे. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर आजच्या सामन्यामध्ये लक्ष असणार आहे.
अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते. तर शेहबाज अहमदने देखील संघासाठी अर्धशतक झळकावले. आजचा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे तर रिंकू सिंग हा संघाचा उपकर्णधार आहे तो कशी कामगिरी करेल यावर सर्वांचे लक्ष आहे.
भारतीय संघाची प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरण सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र, रिंकू सिंग (उपकर्णधार), सूर्यांश शेंडगे, शेहबाज अहमद, हर्ष दुबे, अरशद खान