• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...

महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...

महाराष्ट्रातील हवामानात चढ - उतार पाहिला मिळतोय. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली असून किमान तापमानात वाढ पाहिला मिळतेय.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 10:49 IST|Updated: Nov 24, 2026, 10:51 IST
joinshare
महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...
Image Credit: maharashtra weather update 24 Nov

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...

महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...

2

...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

3

सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

4

'पार्ट्या, सिगारेट, मद्यपान, स्त्रियांच्या मागे...', युवराज सिंगच्या वडिलांना पृथ्वी शॉचा थेट इशारा; Insta स्टोरीने क्रिकेट विश्वात खळबळ

5

पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.


नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरु असून डिसेंबर महिना सुरू होणार आहे, तरीही हवी तशी थंडी पडत नाहीय. नुकताच अक्वान चक्रीवादळ येऊन गेल्यामुळे राज्यात थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण राज्यात अनेक ठिकाणी आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे.

नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात मोठी वाढ पाहिला मिळत आहे. गेल्या सप्ताहात निफाडमध्ये तापमानाचा पारा थेट 6.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. मात्र, आता तापमान वाढून 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने थंडीचा जोर ओसरला. आठवडाभरात तापमानात जवळपास 10 अंशांची वाढ पाहिला मिळत आहे. हवामानातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील वातावरणावर दिसतोय.

महाराष्ट्रातही आजही वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि उबदार आहे, असं हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्येही हवामान कोरडे राहणार आहे.  पुण्यासाठी आज कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहू शकतं, असं हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पुढील दहा दिवस थंडीचा प्रभाव वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आठ जिल्ह्यांत थंडीचा जोर अधिक असणार आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार परिसरातही हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या भागांतही वातावरण कोरडेच राहणार आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात सध्या निसर्गाचं विलोभनीय रूप पाहायला मिळत असून संपूर्ण परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. सकाळपासूनच सर्वच भागात धुक्याचं साम्राज्य असल्यानं आल्हाददायक वातावरण तयार झालंय. मात्र, हेच मनमोहक धुकं आता बळीराजासाठी चिंतेचं कारण ठरलंय! या दाट धुक्यामुळे कांदा आणि इतर तरकारी पिकांवर करपा, मावा आणि तुडतुडे यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली असून, हवामानातील या बदलाचा शेतीपिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

तर देशातील 11 राज्यांना पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Weather