• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

आता भारताचा माजी खेळाडू आणि युट्यूबर आर अश्विनने भारताचा कर्णधार शुभमन गिलवर संताप व्यक्त केला आहे. नक्की काय म्हणाला शुभमन गिलसंदर्भात आर अश्विन सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 24, 2026, 10:04 IST|Updated: Nov 24, 2026, 10:28 IST
joinshare
सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

2

सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

3

'पार्ट्या, सिगारेट, मद्यपान, स्त्रियांच्या मागे...', युवराज सिंगच्या वडिलांना पृथ्वी शॉचा थेट इशारा; Insta स्टोरीने क्रिकेट विश्वात खळबळ

4

पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

5

'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा पहिला सामना शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने खेळला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चांगली कामगिरी केली पण निकाल हा सामन्याचा अनिर्णयित राहिला. पहिल्याच डावामध्ये भारताच्या संघाने 700 हून अधिक धावा केल्या यावेळी भारताचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवेल असे वाटत होते पण दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संघाची खेळी सांभाळली आणि सामना ड्रॅा केला. या सामन्यात 15 ओव्हर शिल्लक असताना दोन्ही संघांनी हातमिळवणी केली आणि त्यानंतर आता अनेक क्रिकेट तज्ञांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता भारताचा माजी खेळाडू आणि युट्यूबर आर अश्विनने भारताचा कर्णधार शुभमन गिलवर संताप व्यक्त केला आहे.

युट्यूबवर आर अश्विन क्रिकेटबद्दल त्याचे मत व्यक्त करत असतो. यावेळी तो म्हणाला भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवायला हवा होता, असे अश्विनचे ​​मत आहे. भारताचा माजी फिरकीपटू म्हणाला, "आम्ही या कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवले, पण आम्ही त्यांना हरवू शकलो नाही. कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवल्याबद्दल कोणीही आम्हाला गुण देणार नाही. गुण विजयानेच मिळतात. लोक म्हणतील की तुम्ही चांगला कसोटी सामना खेळलात. पण, 20 बळी न घेतल्याबद्दल आणि चांगला क्रिकेट न खेळल्याबद्दल तुम्हाला गुण मिळत नाहीत. विशेषतः जेव्हा न्यूझीलंड डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आपल्यापेक्षा वर आहे. त्यांना अडचणीत आणूनही, माघार घेतल्याबद्दल आपण स्वतःवर रागावले पाहिजे हेच मला वाटते."

हे ही वाचा

4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4... बाबर आझमने ILT20 मध्ये केला कहर! ठोकली हाफ सेंच्यूरी

केवळ आर अश्विनच नाही, तर भारताचे माजी कर्णधार क्रिस श्रीकांत यांनीही दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच हार मानण्याच्या निर्णयावर तीव्र टीका केली. एका पत्रकार परिषदेत शुभमन गिलने सांगितले की, त्याचे गोलंदाज थकले होते, त्यामुळेच त्यांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. यावर श्रीकांत म्हणाले, "त्यांनी एक तास आधीच हार का मानली? तुम्ही एका तासात पाच विकेट्स घेऊ शकत नाही? मी तर आणखी एक तास खेळलो असतो. तुमचे गोलंदाज नक्कीच थकले होते, पण तुम्ही विजयाच्या अगदी जवळ होता. जर तुम्ही आणखी एक विकेट घेतली असती, तर न्यूझीलंडकडे फलंदाजीसाठी फक्त तळाचे फलंदाज उरले असते. म्हणूनच त्यांनी हार मानून सामना अनिर्णित ठेवण्याचा घेतलेला निर्णय मला समजत नाही."

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना हा 1 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. भारताकडे 350 हून अधिक धावांची आघाडी होती आणि न्यूझीलंडला सर्वबाद करण्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु सपाट खेळपट्टी, नरम पडणारा चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला केवळ 5 बळी मिळवता आले, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News