मागील काही दिवसांपासून पाकिस्तान स्टार बाबर आझमला त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या खराब फॅार्ममुळे त्याला सोशल मिडियावर देखील ट्रोल केले जात आहे.
बाबर आझमने आता त्याच्या खेळीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयएलटी20 च्या पदार्पण सामन्यामध्ये 86 धावांची खेळी खेळून तो चर्चेचा विषय ठरला आहे.
1/8
बाबर आझमची खेळी
खराब फॉर्ममुळे बऱ्याच काळापासून टीकेचा सामना करणाऱ्या बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये आपली छाप पाडली. आयएलटी20 लीगमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
बाबर आझमची खेळी
आझमने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावत, आपल्या डेझर्ट वायपर्स संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
बाबर आझमची खेळी
शारजा वॉरियर्सविरुद्ध बाबरने 51 चेंडूंमध्ये 86 धावा ठोकल्या. त्याने 13 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या या प्रभावी कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
बाबर आझमची खेळी
आयएलटी20 पूर्वी, बाबरने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि तिरंगी मालिका खेळली, ज्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
बाबर आझमची खेळी
तिरंगी मालिका आणि कसोटी सामने मिळून त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले. यामुळे त्याच्या फलंदाजीवर सर्वत्र टीका झाली, पण बाबरने आयएलटी20 मध्ये आपला फॉर्म परत मिळवून सर्वांना शांत केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
बाबर आझमची खेळी
डेझर्टविरुद्धच्या आयएलटी20 सामन्यात, शारजा नाणेफेक हरल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. शारजाची फलंदाजीची कामगिरी खराब होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
बाबर आझमची खेळी
संघाला निर्धारित 20 षटकांत 166 धावांवर रोखण्यात आले. पॉल वॉल्टर हा शारजासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने 43 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
बाबर आझमची खेळी
वॉल्टर वगळता, शारजाचा इतर कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. डेझर्ट वायपर्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, खुजैमा तन्वीर आणि कर्णधार शादाब खान यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया