• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. यादिवशी घरात किती दिवे लावावे आणि दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय जाणून संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 07:43 IST|Updated: Nov 24, 2026, 07:45 IST
joinshare
आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या
Image Credit: dev diwali 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

2

'मी दोषी आहे...' गर्लफ्रेंडला धोका दिल्यानंतर 'या' अभिनेत्याने सोशल मिडियावर मागितली माफी

3

आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2026 : देव दिवाळी - कार्तिक पौर्णिमेला समसप्तक योग! 4 राशीच्या लोकांना बंपर लाभ, मिथुनला प्रगतीचे संकेत

4

डेंजर बातमी! तरुणाच्या पार्श्वभागातून डॉक्टरांनी बाहेर काढला 4 फूट लांबीचा शॉवर पाईप

5

शाळा बुडवून गेले मॅच पाहायला, चोरी कॅमेऱ्यामध्ये कैद! कॅमेरामनची नजर अन्; Video viral

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाला देव दिवाळी साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात देव दिवाळीला अतिशय महत्त्व आहे. यादिवशी मंदिर, नदी काठ, घाट याठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. असं म्हणतात या दिवशी स्वर्गातील देव पृथ्वीतलावर येतात, म्हणूनच याला देव दिवाळी असं म्हटलं जातं. यादिवशी दीपदान करण्याची प्रथा आहे.

कार्तिक पौर्णिमा तिथी

कार्तिक पौर्णिमा तिथी ही 23 नोव्हेंबर 2026 सोमवारी रात्री 11:42 वाजता सुरु झाली असून पौर्णिमा तिथी 24 नोव्हेंबर 2026, रात्री 8:23 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 म्हणजे आज देव दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

देव दिवाळीचा शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात प्रदोष काळ आणि गोरज मुहूर्त याला अतिशय महत्त्व आहे. सूर्यास्तच्या जवळपासचा हा अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे प्रदोष काळ आणि गोरज मुहूर्त दिवे लावणे शुभ मानले जाते.  असं म्हणतात की देव दिवाळीच्या दिवशी दीपदान केल्यास पुण्यप्राप्त होतं. जीवनातील अंधकार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर देव दिवाळीला प्रदोष काळ संध्याकाळी 5:56 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:56 ते रात्री 8:30 दरम्यान असणार आहे.

देव दिवाळीची पौराणिक कथा काय?


देव दिवाळीच्या दिवशी महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं. म्हणून हा दिवस देव विजय म्हणून स्वर्गात दीपोत्सव साजरा करतात.

देव दिवाळीत दिवे लावणे शुभ

कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळीला घरात किमान पाच दिवे लावले पाहिजे.

दोन दिवे हा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावावा. हे दिवे मोहरीच्या तेलाचे असावे. असं म्हणतात यामुळे घरावरील वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होतं.

त्यानंतर एक दिवा तुळशी वृंदावन आणि एक दिवा घरातील देवघरात लावावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

पाचवा दिवा हा घरातील पाणी साठवले असतात तिथे लावणे शुभ मानले जाते. तसंच तुम्ही एक दिवा तुमच्या परिसरातील पिंपळाच्या झाडाजवळही लावू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Astrology
Hindu Religion
Hindu Festivals