अभिनेता अविनाश मिश्रा त्याच्या वैयक्तिक वादामुळे सातत्याने मागील काही दिवसांपासून चर्चेत पाहायला मिळाला आहे. अभिनेता अविनाश मिश्रा आणि त्याची गर्लफ्रेंड इशा सिंग यांचे नाते मागील काही दिवसांपासून चर्चेत पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या खतरो के खिलाडी या शोचा विजेता झाल्यानंतर अविनाश सिंग पुन्हा एकदा चर्चेत पाहायला मिळाला. यावेळी इशा सिंग आणि अविनाश सिंग यांनी त्यांचे नाते अनेकदा जाहीरपणे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच इशा सिंगने अविनाशला सोशल मिडियावर अनफॅोलो केले होते आणि त्याच्या ब्रेकअपच्या बातम्या सुरु झाल्या. आता अविनाशने स्वत: सोशल मिडियावर माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी अविनाश सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये तो ब्रेकअप झाल्यानंतर एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसल्याने हा वाद आणखी वाढला. तो डीजे स्टेशनवर आला आणि त्याने 'बेवफा तू निकली' हे गाणे वाजवले. त्याने असेही म्हटले की, जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असते, तेव्हा हे गाणे योग्य ठरते. या व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला त्यानंतर सोशल मिडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती आणि तिने स्पष्टीकरण देखील दिले होते, एवढेच नाही तर अभिनेत्याला इशारा देखील दिला होता. ईशाचा सख्खा भाऊ आणि दत्तक भाऊ रजत दलालने या अभिनेत्याचा पर्दाफाश केला. लोकांनी अविनाशला ट्रोलही केले, वाढता वाद पाहून, अविनाशने आता त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक मोठा व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.
हे ही वाचा
अभिनेता अविनाश सिंगने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे आणि यामध्ये त्याने माफी मागितली आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतो की, " त्याला आता हा वाद संपवायचा आहे, त्याने ईशा सिंगसोबतच्या ब्रेकअपसाठी स्वतःलाही जबाबदार धरले. अभिनेता म्हणाला, "मी माझ्या डीजेवर एक गाणे वाजवले. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यात अनेक फेरफार केले जात आहेत. मला माहित आहे की यामुळे ईशाला सर्वात जास्त त्रास होत आहे, तिचे कुटुंब दुःखी आहे. माझा तसा कोणताही हेतू नव्हता. पण जे काही घडले त्यासाठी मी माफी मागतो. मी ईशासाठी जबाबदार आहे आणि आम्ही विभक्त झालो आहोत. मी दोषी आहे. ही माझी चूक आहे. मी फक्त माफी मागायला आलो आहे."
Avinash Mishra gets emotional as he admits that he was at fault for his separation from Eisha Singh. The actor breaks down while reflecting on their relationship, saying, “Hum jo alag hue, meri galti hai.” @avinash_world . . . #AvinashMishra #EishaSingh #AvinashEisha #Cheating #IndiaForums
— India Forums (@indiaforums) November 23, 2026
मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, या प्रकरणात कुटुंबियांना आणि मित्रांना गोवू नका. हे घडायला नको होतं. मी सर्वांना विनंती करतो की हे प्रकरण इथेच संपवा, ते वाढवू नका. हा दोन व्यक्तींमधील प्रश्न आहे, कुटुंबियांना आणि मित्रांना अशा धमक्या पाठवू नका. मला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. मला स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला सावरायचे आहे. हे महत्त्वाचे आहे. मी बरा झाल्यावरच परत येईन. तोपर्यंत, सर्वांनी कृपया स्वतःची काळजी घ्या. चला, हे प्रकरण इथेच संपवूया. अभिनेत्याने शेअर केलेले व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.