Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 24 November 2026 in Marathi : आज देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमा आहे. त्यासोबत आजच्या शुभ दिनी समसप्तक राजयोग आणि परीघ योग आहे. तर चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळणार असून वरिष्ठ तुमचं कौतुक करणार आहे. जोडीदाराच्या लहान चुकांकडे दुर्लक्ष करणे नात्यासाठी हिताचे ठरणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. व्यावसायिक दौऱ्यात यश मिळणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळणार आहे. जोडीदाराच्या यशामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या उत्साह घेऊन आला आहे. नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. छुपे शत्रू कामात अडथळे निर्माण करतील, पण सकारात्मक दृष्टिकोनातून खंबीरपणे पुढे जा.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. व्यवसायातून नफा मिळणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठीही चांगला असणार आहे. गाडी चालवण्याचा सराव करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असणार आहे. कोणत्याही प्रकल्पात यश मिळणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. एखादी पार्टीमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात अधिक बळकटी येणार आहे. नवीन कंत्राटांमुळे मोठा नफा मिळणार आहे. घरात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमची कामं पूर्ण होण्यास सहकाऱ्याकडून मदत मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सुख असणार आहे. नातेवाईक तुमच्या लग्नाबद्दल चर्चा करणार आहेत.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कामात पालकांचा पाठिंबा मिळणार आहे. मुलांच्या यशामुळे आनंद मिळणार आहे. महिला घरकामात बिझी राहणार आहेत.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
तुमच्या आयुष्याला एक नवीन बदल पाहिला मिळणार आहे. घरात उत्साहाचे वातावरण असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यापारी लोक एखादा मोठा करार करु शकतात.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. धावपळीची कामं करावी लागणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहात. तुमच्या क्षमतेनुसार आज तुम्ही काम करणार आहात.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. धार्मिक स्थळाला भेट देणार आहात. आर्थिक स्थिती लाभामुळे मजबूत होणार आहे. कुटुंबात आनंद नांदणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे. घरातील वातावरण उत्तम असणार आहे. जोडीदारासोबत संवादात काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. सर्व कामे वेळेवर पूर्ण होणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. जोडीदारासोबत दुपारच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणार आहात. स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यास तुम्हाला यश प्राप्त होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)