• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

'पैसे मुंबईतून जाणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा जाणार आहे. त्यासाठी अमित शहा सारखे मुंबईत फेऱ्या मारत आहेत,' असं विधानही या खासदाराने केलं आहे. नेमकं प्रकरण काय आणि यावर कोणत्या पक्षाने काय म्हटलंय जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 08:27 IST|Updated: Nov 24, 2026, 08:40 IST
joinshare
'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'
Image Credit: महत्त्वाच्या राजकीय पक्षातील नेत्यांनी यावर नोंदवलं मत (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

2

'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

3

सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार मॅच? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती

4

आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

5

संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला असून एका मतासाठी सत्ताधाऱ्यांकडून तब्बल 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचं म्हटलं आहे. राऊत यांनी केलेल्या विधानावर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनेही मत नोंदवलं आहे. नेमकं कोणत्या निवडणुकीबद्दल राऊत हे म्हणालेत आणि त्यावर अन्य पक्षांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात... 

अधिवेशनावरुन नाराजी

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हिवाळी अधिवेशनासंदर्भात घोषणा होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "माझा आकडा खर आहे कोणी आक्षेप घेतला आहे का? गेल्या काही महिन्यांमध्ये अमित शहा येथे दोन महिन्यात सात वेळा आले. मणिपूरला बघा तिकडे काय चालू आहे. तिकडे राज्यात जा! कोणाचा आक्षेप आहे मला सांगता का? मी जे काल म्हणालो आहे त्यावर कोणी आक्षेप घेतला आहे? का त्याच्यावर मी त्याला उत्तर देतो. मी कोणाविषयी व्यक्तिगत काही टिपणी करणार नाही पण अद्याप संसदेचं हिवाळी अधिवेशन घेतला जात नाही हे नियमबाह्य आहे. संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही एक अधिवेशन गुंडाळत आहात. संसदेत एवढी हिम्मत तुमची होते कारण तुम्हाला अहंकार आहे," असं राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हटलं आहे. "अधिवेशन जर आम्ही घेतलं तर डी लिमिटेशन संदर्भातला बिल घेऊन येऊ आणि मंजूर करून आणि पडेल ती किंमत देऊन मग खासदार विकत घेऊ पक्ष फोडून संसद बंद पाडू," अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याची टीका राऊत यांनी केली.

भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारं बिल

"जेव्हा पक्ष फुटत नाही द्रमुक असेल, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी असेल पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची, इतर काही लहान पक्ष आहेत, आमच्यावर सुद्धा प्रयोग झाला. आमची सहा लोक फोडली. तेव्हा अमित शहांकडून किंवा भाजपकडून जे एजंट नेमलेले आहेत आकडा पूर्ण करण्यासाठी जी रक्कम लागते या मनी मार्केटमध्ये, नॅशनल स्टॉक एक्सेंज भाजपचं स्वतःचा राष्ट्रीय बाजार आहे.  त्याच्यामध्ये खासदारांचा दीडशे कोटींचा भाव चालला आहे. मतदान करा, डी लिमिटेशन बाजूने! हे मी सत्य सांगत आहे. याच्यावर कोणाला काही बोलायचं असेल तर बोला! मुळात ही संस्कृती आणली कोणी? आम्ही पैसे देत नाही. महाराष्ट्रातले आमदार, खासदार चिंचोके देऊन फुटले का? की त्यांची खण नारळाने ओटी भरली म्हणून फुटले? त्यांनाही 50-50 कोटी रुपये दिले तेव्हा फुटले! हे तर महत्त्वाचे बिल आहे. 2029 च्या दृष्टीने भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारं बिल असल्यामुळे 150 कोटी रुपये घ्यायचे आणि आम्हाला मतदान करायचं ही सर्व पार्टींना ऑफर आहे ," असा दावा राऊत यांनी केला आहे.

व्यक्तिगत खासदारकी आम्ही वाचवू, अशी ऑफर

"त्या त्या पक्षातल्या लोकांना अॅप्रोच करून व्यक्तिगत  खासदारकी आम्ही वाचवू. दीडशे कोटी महाराष्ट्रमध्ये दुष्काळाविरूद्ध लढण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. खासदार डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी त्यांना हवे आहेत. त्यासाठी 150 कोटीची ऑफर होत असेल! पक्षाला सुद्धा ऑफर आहे. छोट्या आणि व्यक्तिगतरीत्या जर पक्ष फुटत नसेल तर त्या पक्षातला खासदारांना ऑफर आहे तुम्ही फुटा," असा आरोप राऊत यांनी केला आहे.

अमित शहांनी टार्गेट दिलं

"पैसे मुंबईतून जाणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा जाणार आहे. त्यासाठी अमित शहा सारखे मुंबईत फेऱ्या मारत आहेत. आता पैसे कुठून जाणार? पैसे 'एस आर ए'चsे प्रकल्प जे मी परवा म्हणालो दीडशे प्रकल्प नियमबाह्य पद्धतीने होत आहेत. त्यानंतर नगर विकास खातं प्रत्येकाला कोटा दिलेला आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीसुद्धा दीड हजार कोटीचं टारगेट आहे. अमित शहा यांनी दिलं आहे हे टार्गेट! कसा महाराष्ट्र लुटला जातो आहे हे पहा. डी लिमिटेशन बिलासाठी सुद्धा त्यापेक्षा मोठं टारगेट आहे. काही मंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली आहे पण मला मुख्यमंत्री करा," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

सनसनाटी निर्माण करण्याचे...

राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी यासंदर्भात बोलताना, "राऊतांनी आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या घरचे त्यांना सिरियसली घेत नाहीत मग आम्ही का घेऊ? त्यांचे काम सनसनाटी निर्माण करण्याचे आहे. ते काम ते करत आहेत. त्यांचे आरोप कधी सत्यात आले का?" असा सवाल केला आहे.

यावर काँग्रेसचं काय म्हणणं?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात बोलताना, "संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडे माहिती असेल. भाजपकडे पैसा इतका मोठा झाला आहे. मित्रांच्या माध्यमातून देश लुटला गेला आणि मित्रांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी गर्भश्रीमंत झाली आहे. संविधान व्यवस्था तोडण्यासाठी, जी त्यांना तोडायची आहे, त्यासाठी ते मुबलक पैसा खर्च करू शकतात. त्यामुळे संजय राऊत म्हणाले ते काही चुकीचे नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भाजपाने काय म्हटलं?

भाजपाचे नवनाथ बन यांनी यासंदर्भात बोलताना, "पैसा देऊन आमदार-खासदार विकत घेता येत नाहीत. त्यासाठी जनतेचे प्रेम आणि विश्वास संपादन करावा लागतो. भाजप आणि एनडीए जनतेची कामे करून विश्वास मिळवत आहेत. दुसरीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पैशाच्या जोरावर राजकारण करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे," असा टोला राऊत यांना लगावला.

अद्याप आमच्याकडे...; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"डिलिमिटेशन बिल अद्याप आमच्याकडे आलेलं नाही. बिल आल्यानंतर पक्ष सविस्तर भूमिका मांडेल," असं मत सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्त केलं. 
राष्ट्रवादी SP खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सीबीआयकडे तक्रार केली आहे का?

गुणरत्न सदावर्ते यांनी संजय राऊतांनी केलेल्या 150 कोटी रुपयांच्या ऑफरवरुन कठोर शब्दांमध्ये टीका केली. "राऊत हे खासदारांचा सार्वजनिक अपमान करणारी व्यक्ती आहे. त्यांनी यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली आहे का? संज्याची बोलाचा भात आणि बोलाची कढी," असं म्हणत सदावर्तेंनी राऊतांवर निशाणा साधला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
Indian Politics
Political News