• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video

संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video

या जोडप्याने 2023 रोजी परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर तिच्या करिअरची भरभराट झाली असली तरी त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबद्दल त्याने एक अत्यंत भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 07:21 IST|Updated: Nov 24, 2026, 08:02 IST
joinshare
संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video
Image Credit: सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा दिसून येतेय (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार मॅच? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती

सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार मॅच? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती

2

आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

3

संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video

4

'मी दोषी आहे...' गर्लफ्रेंडला धोका दिल्यानंतर 'या' अभिनेत्याने सोशल मिडियावर मागितली माफी

5

आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2026 : देव दिवाळी - कार्तिक पौर्णिमेला समसप्तक योग! 4 राशीच्या लोकांना बंपर लाभ, मिथुनला प्रगतीचे संकेत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोशल मीडियापासून ते वेब सिरीज आणि चित्रपटांपर्यंत अनेक माध्यमांमधून चर्चेत असलेली अभिनेत्री कुशा कपिलाचा एक्स पती, जोरावर सिंग अहलुवालियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही वर्षांत स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल जोरावरने या व्हिडीओमधून मन मोकळं केलं आहे. जोरावरने स्वतःचा 'लूझर' (अपयशी व्यक्ती) असा उल्लेख केला आहे. जोरावरने आपले वैवाहिक आयुष्य, कॉर्पोरेट नोकरी, स्वतःचे घर आणि आत्मविश्वास गमावल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर, जोरावर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी काय काय करतोय याबद्दलही बोलला आहे.

आयुष्यात केलेल्या चुकांची कबुली

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वत:च्या आयुष्यात केलेल्या चुकांची कबुली देताना जोरावरने, "मी कबूल करतो की मी एक 'लूझर' आहे. गेल्या काही वर्षांत, माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी मी गमावल्या आहेत. माझा संसार (वैवाहिक आयुष्य) मी टिकवू शकलो नाही, कॉर्पोरेट नोकरी गमावली, स्वतःसाठी उभारलेले घर गमावले, माझी प्रतिष्ठा गमावली, स्वतःबद्दल चांगलं वाटण्याची भावना गमावली आणि इतरांशी सतत स्वतःची तुलना करण्याच्या लढाईतही मी हरलोय," असं व्हिडीओत म्हटलं आहे.

या गोष्टींवर केली मात

आयुष्यातील सर्वात लो पॉइंटला म्हणजेच सर्वात कठीण परिस्थितीत पोहोचल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदललाय हे जोरावरने सांगितलंय. मात्र, त्याचवेळी जोरावरने अशा काही गोष्टींवरही मात केल्याचं नमूद केलंय. स्वतःबद्दल वाईट वाटून घेणे, आयुष्याकडे पाठ फिरवण्याची म्हणजेच निराश होऊन हार मानण्याची प्रवृत्तीवर आपण मात केली असल्याचं जोरावरने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zorawar Singh Ahluwalia (@zorawarahluwalia)

 

मी अगदी तळाला पोहोचलो तेव्हा...

स्वत:मधील या परिवर्तनाबद्दल बोलताना जोरावरने, "सहा वेळा पडलात, तर सातव्यांदा उठा. जेव्हा मी हरलो, तेव्हा मी अगदी तळाला पोहोचलो होतो. जेव्हा मी त्या तळाला पोहोचलो, तेव्हा मी तो तळही मागे सोडला म्हणजेच त्यातूनही बाहेर पडलो," असं म्हणत संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं.

लहानपणापासून लूझर लेबल

लहानपणापासूनच 'लूझर' असे लेबल लागल्यामुळे मला या टॅगचा खूप त्रास झाला, अशी कबुली जोरावरने दिली. मात्र, आता या शब्दापासून पळून जाण्याऐवजी, तो स्वीकारण्याचा निर्णय मी घेतलाय असं जोरावरने सांगितलं. "मी एक 'लूझर' आहे. मी असा एक 'लूझर' आहे ज्याने सर्व काही गमावले आहे, तरीही तो स्वतःवर विश्वास ठेवतो," असे त्याने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zorawar Singh Ahluwalia (@zorawarahluwalia)

 

अनेक सेलिब्रिटींनी दिला धीर

जोरावरच्या या भावूक व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. रॅप गायक बादशाहनेही या पोस्टवर आयुष्यातील आव्हाने आणि वैयक्तिक प्रगतीबाबत प्रोत्साहन देणारा मेजेस कमेंटमधून शेअर केला आहे. बादशाहने, "देवाचा आशीर्वाद आपल्या खांद्यावर पेलण्यासाठी, देव आधी तुम्हाला एक ओझे देतो, जेणेकरून तुमचे खांदे भविष्यातील जबाबदारीसाठी तयार होतील. या काळाबद्दल देवाचे आभार मानावेत; जरी हे ऐकायला विचित्र वाटत असले, तरी ही तुम्हाला देवाकडून मिळू शकणारी सर्वात सुंदर भेट आहे. हा दबावच भविष्यात एका हिऱ्याची निर्मिती करेल, माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला जेव्हा तडा जातो, तेव्हाच त्या भेगेतूनच प्रकाश आत येतो. तू नक्कीच या परिस्थितीतून बाहेर पडशील," असं म्हटलं आहे.

अभिनेत्री आयेशा खाननेही जोरावरला धीर देताना, "आयुष्यात पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या परिस्थिती 'मधून' जाणे. जेव्हा तुम्ही अगदी तळाला असता, तेव्हा तिथून वर जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो," असं म्हटलं आहे. तर अभिनेता कुशल टंडनने, "तुला अधिक बळ मिळो," असं म्हणत जोरावरच्या संघर्षाची दखल घेतली आहे.

तीन वर्षांपूर्वी घटस्फोट

कुशा कपिला आणि जोरावर सिंग अहलुवालिया यांनी 26 जून 2023 रोजी परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केले होते आणि अनेक वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zorawar Singh Ahluwalia (@zorawarahluwalia)

दोघांनाही सोशल मीडियावरुन यासंदर्भातील माहिती दिली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Marathi News
News in Marathi