किवीला टीम इंडियाने घरच्या मैदानावर केलं पराभूत, भारताचा 4 विकेट्सने विजय
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचा पहिला सामना आज पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करु मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.
India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेला आज सुरुवात झाली, या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये 4 विकेट्सने विजय मिळवला, या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर भारताच्या संघाने मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यामध्ये टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली, या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 225 धावा केल्या होत्या. भारताच्या संघाने प्रत्युत्तरात 225 धावांचे लक्ष 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केले. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्माने संघासाठी 29 धावांची खेळी खेळली, तर संजू सॅमसनने संघासाठी 33 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 8 चौकार मारले.
हे ही वाचा
जपानमध्ये भारतीय पॅरा खेळाडू अडचणीत! हाऊसकिपिंगचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण
त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघासाठी प्रभावी कामगिरी केली, 28 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. 24 धावा अक्सर पटेलने केल्या तर 42 नाबाद धावांची खेळी नमन धीरने केली, यामध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. न्यूझीलंडच्या संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर ग्लेन फिल्प्सिसने संघासाठी 40 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 3 षटकार आणि 8 चौकार मारले.
टीम इंडियाने पहिला टी20 सामना चार गडी राखून जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. संजू सॅमसनने 67, तर श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 42 धावा केल्या. भारताने शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सहा गडी गमावून सामना जिंकला. भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने आजपर्यंत 220 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केलेला नाही.