जपानमध्ये सध्या पॅरा आशियाई खेळ 2026 सुरु आहेत, मागील काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंची या स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. जपानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा. जपानमध्ये भारतीय पॅरा खेळाडू हे आशियाई खेळ खेळण्यासाठी नागोया येथील एका हॉटेलमध्ये राहत आहेत यादरम्यान हॅाटेलमधील महिला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप भारतीय जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेखवर करण्यात आला आहे नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
ही धक्कादायक घटना 19 ऑक्टोबर रोजी घटना घडली, टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, आलम शेखला मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी जपानमधून भारतात परत पाठवण्यात आले आहे. भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) आलम शेखवर आजीवन बंदी घालण्याचा विचार करत आहे. भारतीय संघाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही कथित घटना सोमवारी त्या हॉटेलमध्ये घडली जिथे भारतीय पॅरा जलतरण संघ थांबला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही कथित घटना घडली तेव्हा एक महिला हाऊसकीपिंग कर्मचारी शेख यांच्या खोलीत काम करत होती. त्यानंतर ही तक्रार स्थानिक आयोजन समिती आणि भारतीय संघाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. आयोजन समितीनेही या घटनेची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली.
हे ही वाचा
अहवालामध्ये असे सांगण्यात आले आहे की, जपानमध्ये ज्याठिकाणी भारताचा संघ हॅाटेलमध्ये राहत होता त्याठिकाणी हॅाटेलमध्ये एक कर्मचारी आलम शेखच्या खोलीत काम करत होती. यावेळी भेटीच्या दरम्याने शेखने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, ती पहिला तेथून पळून गेली आमि तिने या घटनेची माहिती लगेचच वरिष्ठांना दिली. हॅाटेलमधील वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर लगेचच शेख याला लगेचच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना त्यांना न्यायालयासमोर हजर करायचे होते. मात्र, स्थानिक आयोजन समितीने हस्तक्षेप करून भारतीय शिष्टमंडळाला हॉटेल कर्मचारी आणि हॉटेलची लेखी माफी मागण्यास आणि शेख यांच्या प्रत्यार्पणाची व्यवस्था करण्यास सांगितले.
ABSOLUTE SHAME, THIS IS UNACCEPTABLE!! Indian para-swimmer Mohammad Shams Aalam Shaikh has reportedly been detained and deported from Japan following allegations of sexual misconduct involving a hotel staff member during the Asian Para Games 2026. The female staff member was reportedly carrying out his housekeeping duties when she was allegedly touched inappropriately by 40yo Aalam. This is deeply disturbing and completely unacceptable. The Paralympic Committee of India is reportedly considering a lifetime ban, pending a formal hearing. [India Today ]
— The Khel India (@TheKhelIndia) October 22, 2026
या प्रकरणामध्ये लेखी माफी मागितल्यानंतर खेळाडूला सोडवण्यात आले आणि या घटनेनंतर 40 वर्षीय व्यक्तीला दुसऱ्या हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी जपानमधून भारतामध्ये पाठवण्यात आले आहे. पीसीआयने नवी दिल्ली सरकारला आलम शेखवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. आशियाई पॅरा गेम्सनंतर, पीसीआयचे प्रतिनिधी, पॅरा-जलतरण प्रशासक आणि भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य या घटनेवर चर्चा करतील आणि क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांना कारवाईची शिफारस करतील अशी अपेक्षा आहे.