SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ड्रामा! क्रिकेट प्रेझेंटरकडून मोठी चूक

नाणेफेकीच्या वेळी भारताच्या संघाचा कर्णधार तिलक वर्माने तर पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हॅन्डशेक केला नाही त्याचबरोबर आणखी एक ड्रामा नाणेफेकीच्या वेळी पाहायला मिळाला, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 22, 2026, 16:38 IST | Updated: Nov 22, 2026, 16:49 IST
Join

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये सामन्याच्या सुरुवातीलाचा मोठी चुक पाहायला मिळाली. आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. नाणेफेकीचा निर्णय घेणाऱ्या मुलाखतकाराकडून एक मोठी चूक झाली, ज्यामुळे पाकिस्तानी कर्णधार अब्दुल समदला आपली चूक सुधारून आपला निर्णय मागे घ्यावा लागला. नाणेफेकीच्या वेळी भारताच्या संघाचा कर्णधार तिलक वर्माने तर पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हॅन्डशेक केला नाही त्याचबरोबर आणखी एक ड्रामा नाणेफेकीच्या वेळी पाहायला मिळाला, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया कप रायझिंग स्टार्स सामना कतारमधील दोहा येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात नेपाळचा 306 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात युएईला पराभूत केले आहे. अशाप्रकारे, दोन्ही संघ आपले पहिले सामने जिंकून येथे आले आहेत. मात्र, नाणेफेकीदरम्यान एक छोटासा नाट्यमय प्रसंग घडला.  सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक केली. पाकिस्तानी कर्णधार अब्दुल समदने छापा असल्याचे म्हटले, आणि नाणे पडताच मुलाखतकाराने काटा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तिलक आणि समद नाण्याकडे पाहू लागले.

हे ही वाचा

IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकले, भारतासमोर गोलंदाजीचे आव्हान! पहा दोन्ही संघाची Playing 11

समदच्या लक्षात आपली चूक आली आणि त्याने छापा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुलाखतकाराने आपली चूक सुधारली. मागील काही वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढला आहे, त्यामुळे भारतीय सीमारेषेवर तणाव वाढल्यामुळे आता मैदानावर देखील तो तणाव वाढला आहे. सामन्याच्या वेळी देखील दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली आहे. आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढल्यानंतर हर्षित राणा या सामन्यामध्ये कमालीच्या फॅार्ममध्ये पाहायला मिळाला आहे.

भारताच्या संघाने नेपाळविरुद्ध कमालीची कामगिरी केली, या सामन्यामध्ये भारताच्या दोन फलंदाजी शतके झळकावली होती. त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांची देखील प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली, नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये प्रिन्स यादवने संघासाठी पाच विकेट्स पहिल्याच ग्रुप स्टेज सामन्यामध्ये घेतले. तर हर्षित राणाने संघाला 4 विकेट्स मिळवून दिले. भारताच्या संघाने नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये 306 धावांनी विजय मिळवला आहे, आता टीम इंडियाची नजर पाकिस्तानविरुद्ध सामन्यावर असणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES