भारत पाकिस्तान 30 ऑक्टोबरला भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming?
30 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाँगकाँग सिक्सर्स या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्साह नेहमीच शिगेला असतो. आता काही तासांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांचे संघ म्हणजेच भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतात, तेव्हा उत्साह आणि जोश शिगेला पोहोचतो. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 30 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाँगकाँग सिक्सर्स या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
हाँगकाँग सिक्सर्स या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू नाही 7 खेळाडू खेळतात. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ प्रत्येकी 6 ओव्हर खेळतात, या लहान फॉरमॅटमध्ये, फलंदाज जलद धावा करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे चाहत्यांना चौकार आणि षटकारांची रेलचेल पाहायला मिळते. हा सामना टी20 क्रिकेटपेक्षाही जलद असतो, त्याचा फॅारमॅट वेगळा असतो आणि कमी वेळेमध्ये पूर्ण देखील होतो. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना हा 30 ऑक्टोबर रोजी हाँगकाँगच्या मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर भिडणार आहेत.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेमधील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.45 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याच्या अर्ध्यातासाआधी दोन्ही संघाचे कर्णधार हे मैदानावर नाणेफेकीसाठी मैदानात येतील. भारतीय संघाचे कर्णधारपद सुरुवातीला भुवनेश्वर कुमारच्या हाती सोपवण्यात आले होते पण त्याला टी20 संघात स्थान मिळाल्यानंतर आता कृणाल पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर पाकिस्तानचे कर्णधारपद हे मोहम्मद अब्बास आफ्रिदी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
हे ही वाचा
IND vs NZ 4th T20 सामना मोफत पाहता येणार? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती
कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?
हाँगकाँग सिक्सेस येथे होणारा भारत-पाकिस्तान सामना भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर थेट प्रसारित होणार नाही. तथापि, आपण सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) पाहू शकता. भारतीय चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान हाँगकाँग सिक्सेस सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲप आणि त्याच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. मात्र, त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल.
दोन्ही संपूर्ण संघ
भारत: कृणाल पंड्या (कर्णधार), राहुल त्रिपाठी, शशांक सिंग, नितीश राणा, कुलवंत खेजरोलिया, राहुल तेवतिया, टी नटराजन.
पाकिस्तान : मोहम्मद अब्बास आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, इरफान खान, अहमद दानियाल, मोहम्मद शहजाद, साद मसूद, ख्वाजा नाफे.