भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आणि मालिकेमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आणि मालिका देखील नावावर केली आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी या मालिकेमध्ये कमालीच्या फार्ममध्ये पाहयला मिळाले आहेत. या मालिकेचा चौथा सामना काही तासांमध्ये सुरु होणार आहे, या मालिकेचा चौथा सामना क्रिकेट चाहते कधी आणि कुठे मोफत पाहणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या संघाने एकतर्फी मालिका खेळली आहे. टीम इंडियाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे, आता चौथा सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्साह आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या टी20 मालिकेच्या चौथ्या सामन्याला सुरुवात ही भारतीय प्रमाणवेळेनुसार 12.30 वाजता होणार आहे, या मालिकेचा हा चौथा सामना हा न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर लाज राखण्यासाठी मैदानामध्ये विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरतील. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार 12.00 वाजता मैदानात येतील.
हे ही वाचा
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. या सामन्याचे मोबाईल किंवा लॅपटॅापवर पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हा सामना सोनी लिव्हवर क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना सब्स्क्रिब्शनची गरज लागणार आहे. या सामना मोफत कोणत्याही अॅप किंवा वेबसाईटवर चाहत्यांना पाहायला मिळणार नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 30 ऑक्टोबर रोजी ईडन पार्कवर होणार आहे. इशान किशनने सराव सुरू केला असून तो आता संघात पुनरागमन करू शकतो. तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज असून तंदुरुस्त होताच अंतिम 11 खेळाडूंमध्ये परत येईल. जेव्हा किशन दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यांमधून बाहेर झाला, तेव्हा भारताचा राखीव सलामीवीर वैभव सूर्यवंशीला त्याच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली होती. वैभवने तिसऱ्या टी-20 सामन्यात 45 धावांची शानदार खेळी केली होती. असे असूनही, आता किशन त्याच्या जागी संघात परत येऊ शकतो.