• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, दोघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, दोघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहिले. यावेळी हे तिनही प्रमुख राजकीय नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसले.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 08:17 PM IST|Updated: Oct 29, 2026, 08:22 PM IST
joinshare
एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, दोघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

2

...तेव्हापासून मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहतोय; मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, म्हणाले '2019 पर्यंत नेहमी...'

3

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

4

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर

5

भारत पाकिस्तान 30 ऑक्टोबरला भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Politics:  पदवीधर निवडणूक निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडलेली असतानाच आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपने नेते आशिष शेलार एकाच मंचावर उपस्थित राहले. यावेळी हे नेते एकमेकांसोबत चर्चा  करताना दिसले.  एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर उपस्थित राहिले. 

मुख्यमंत्री फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले आहेत. या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रगंली आहे. महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिनही प्रमुख राजकीय नेते एकाच कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी तिनही नेते एकत्र उपस्थित राहिले. 

मतचोरी, एसआयआर प्रक्रिया, कर्जत वृक्षतोड यांसारख्या विविध मुद्द्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधक आणि ठाकरे बंधूंकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात. अशातच पदवीधर निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलेली असताना हे तिन्ही नेते एका मंचावर येत असल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्यात. 

दरम्यान या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना दिसले. कार्यक्रम सुरु असताना हे तीनही नेते एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. यावेळी सर्व नेत्यांच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा पहायला मिळाल्या. एकमेकांवर टीका करणारे नेते जाहीर कार्यक्रमात एकमेकांसोबत हसत हसत चर्चा करत दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा कार्यक्रम जरी सांस्कृतीक असला तरी   देवेंद्र फडणवीस,  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Indian Politics
Political News