IPL 2027 मध्ये कोण आहे सर्वात महागडा हेड कोच? आशिष नेहरा ते सौरव गांगुली कोणाचा पगार जास्त?
IPL 2027 Head Coach Salary : आयपीएल 2027 साठी काही संघांनी त्यांचे हेड कोच बदलले आहेत. यंदाच्या हेड कोच लिस्टमध्ये त्यामुळे आता जहीर खान सह सौरव गांगुली सारख्या अनेक दिग्गजांची नाव आहेत. तेव्हा आयपीएल 2027 साठी सर्वात महागडा हेड कोच कोण आहे, आशिष नेहरा ते सौरव गांगुली यांच्यापैकी कोणता हेड कोच पगार जास्त घेतो याविषयी जाणून घेऊयात.
IPL 2027 Head Coach Salary : कोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमियर लीगचा 20 वा सीजन हा येत्या काही महिन्यात सुरु होईल. आयपीएल 2027 साठीचं ऑक्शन डिसेंबर महिन्यात गोव्यात पार पडणार आहे. तर त्यापूर्वी सर्व फ्रेंचायझी त्यांच्या आगामी सीजनच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंच्या नावाची घोषणा करतील. त्यापूर्वी काही संघांचे मुख्य प्रशिक्षक सुद्धा बदलण्यात आले आहेत. तेव्हा आयपीएल माफहील सर्व 10 संघांच्या मुख्य प्रशिक्षक म्हणजेच हेड कोचला प्रत्येक सीजनसाठी किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
पंजाब किंग्स :
पंजाब किंग्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंग याची नेमणूक ही 18 सप्टेंबर 2024 रोजी झाली होती. आयपीएल 2025 पासून तो पंजाब किंग्सचा हेड कोच आहे. रिकी पॉन्टिंगला हेड कोच पदासाठी जवळपास 9.5 कोटी रुपयांचं मानधन मिळतं अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे.
गुजरात टायटन्स :
गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहरा याची नेमणूक ही 2022 रोजी करण्यात आली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच सीजनला विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहराला प्रत्येक सीजनसाठी 9.5 कोटी रुपयांचं मानधन मिळतं
चेन्नई सुपरकिंग्स :
चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच म्हणून स्टीफन फ्लेमिंगने जवळपास 17 वर्ष सीएसके सोबत काम केले. मात्र आयपीएल 2026 नंतर मात्र त्याने पदाचा राजीनामा दिला आणि त्याने वेगळा मार्ग निवडला. मागच्या महिन्यात सीएसकेने भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची हेड कोचपदी निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जहीर खानला हेड कोच म्हणून प्रत्येक सीजनसाठी 5 ते 7 कोटी रुपये मानधन दिले जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्स :
राजस्थान रॉयल्सचा हेड कोच म्हणून कुमार संगकारा यांनी 2026 मध्ये त्यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. यापूर्वी 2021–2024 दरम्यान सुद्धा ते हेड कोच होते. सध्या कुमार संगकारा यांना राजस्थान रॉयल्सचा हेड कोच म्हणून दर सीजन जवळपास 3.5–5 कोटी रुपये मिळू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2025 आणि 2026 असे सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे हेड कोच अँडी फ्लॉवर यांना जवळपास 4 कोटी रुपयांचं मानधन मिळतं.
लखनऊ सुपर जाएंट्स :
लखनऊ सुपर जाएंट्सचा हेड कोच जस्टिन लँगर याला आयपीएलच्या एका सीजनसाठी जवळपास 4 कोटी रुपयांचा मानधन मिळतं.
मुंबई इंडियन्स :
मुंबई इंडियन्सचा हेड कोच असलेल्या महेला जयवर्धनेला आयपीएलच्या एका सीजनसाठी जवळपास 4 कोटी रुपये मिळतात अशी माहिती आहे. महेला जयवर्धनेला आयपीएल 2025 पासून हेड कोच म्हणून संघाचा भाग बनवण्यात आलं.
सनरायजर्स हैदराबाद :
सनरायजर्स हैदराबादचा हेड कोच असलेल्या डॅनियल व्हेटोरी याला मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रत्येक सीजनसाठी जवळपास 2.5 ते 3.5 कोटी रुपये मिळतील.
कोलकाता नाईट रायडर्स :
कोलकाता नाईट रायडर्सचा हेड कोच म्हणून माजी क्रिकेटर अभिषेक नायर याला नियुक्त करण्यात आलं आहे. अभिषेक नायरला 2.5 कोटी रुपये मानधन देण्यात येत.
दिल्ली कॅपिटल्स :
दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या सौरव गांगुली याला आगामी सीजनसाठी हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. अद्याप त्याला किती मानधन मिळणार याची माहिती नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 4 ते 5 कोटींच्या घरात त्यांचं एका सीजनचं मानधन असू शकतं.