इरफान पठाणने केली गौतम गंभीरची पाठराखण, ट्रोलर्सला दिलं चोख उत्तर
Irfan Pathan On Gautam Gambhir : भारताचा हेड कोच असलेल्या गौतम गंभीरला अनेकदा टीकाकारांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अनेकदा सोशल मीडियावर कोणत्याही कारणाने गंभीरला ट्रोल केलं जातं. याविषयी माजी क्रिकेटर इरफान पठाणने गौतम गंभीरची पाठराखण केली आहे.
Irfan Pathan On Gautam Gambhir : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी20 सीरीज खेळवली जात आहे. यातील दुसऱ्या सामन्यातून विकेटकिपर फलंदाज ईशान किशन हा बाहेर पडला. गुरुवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ईशानला दुखापत झाली. त्यामुळेचवह पहिल्या सामन्यात सुद्धा ईशानच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. तो पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरला होता. मात्र कारण जाणून न घेता यावरून लोकांनी हेड कोच गौतम गंभीरवर टीका केली. यावेळी गौतम गंभीरचा जुना सहकारी आणि माजी क्रिकेटर इरफान पठाणने त्याची पाठराखण केली.
काय म्हणाला इरफान पठाण?
माजी क्रिकेटर इरफान पठाणने एक्सवर एक पोस्ट लिहिली. इरफानने यात स्पष्ट केले की, पहिल्या टी20 सामन्यात दुखापतीमुळे ईशानच्या फलंदाजीच्या क्रमांकात बदल करण्यात आला होता, तरीही लोकांनी त्यासाठी गौतम गंभीरला लक्ष्य केले. इरफान पुढे असेही म्हणाला की, 'कोणावरही टीका करण्यापूर्वी माणसाने विचार करायला हवा'.
इरफान पठाणने लिहिले, 'न्यूझीलंड पहिल्या टी20 सामन्यादरम्यान ईशान किशनला काहीसा त्रास होत होता, म्हणूनच तो फलंदाजीसाठी थोडा उशिरा म्हणजेच खालच्या क्रमांकावर आला. तरीही फलंदाजीचा क्रम बदलल्याबद्दल सर्वांनी गौतम गंभीरला लक्ष्य केले. आजकाल त्याच्यावर टीका करणे हा अनेकांचा आवडता छंदच बनला आहे'.
इरफान पठाणने पुढे लिहिले की, 'कोणतेही मत बनवण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. हे आयुष्यातील सर्व गोष्टींना लागू होते. सोशल मीडियावर 'व्ह्यूज' किंवा 'आकडे' वाढवण्याच्या घाईत, पूर्ण परिस्थिती माहीत नसतानाही तुम्ही नकळत कोणाला तरी दुखवू शकता. त्यामुळे कोणाबद्दलही मत बनवण्यापूर्वी नीट विचार करा'.
न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र (विकेटकीपर).