SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

काव्या मारन आणि अनिरुद्धच्या लग्नाची तारिख ठरली, मुख्यमंत्र्यांनी केली पोस्ट! जाणून घ्या केव्हा आणि कुठे पार पडणार सोहळा?

मागील काही दिवसांमध्ये अनेकदा हैदराबादच्या मालक काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनच्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मिडियावर देखील ते ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाची तारिख आणि ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 17, 2026, 04:08 PM IST | Updated: Oct 17, 2026, 05:52 PM IST
Join

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या डेटिंगची चर्चा मागील काही काळापासून सातत्याने पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मिडियावर देखील ते ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाची तारिख आणि ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे. काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन हे जोडपे चा विवाह ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये होणार आहे, आता या सोहळ्यांची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.

काव्या मारनचे वडील, सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांनी त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांच्यासह काल ज्युबिली हिल्स येथे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी आमंत्रण करण्यासाठी केले होती, यावेळी मुख्यमंत्र्यांना भेट देखील दिली होती. काव्या मारनच्या लग्नाच्या ग्रीसमधील स्वागत समारंभाचे आमंत्रण दिले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्ट केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मिडियावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, सन ग्रुपचे चेअरमन श्री कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी श्रीमती कावेरी मारन यांनी ज्युबिली हिल्स येथील निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री श्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली आणि त्यांना आपली मुलगी काव्या मारन हिच्या विवाह स्वागत समारंभासाठी आमंत्रित केले. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचा विवाह स्वागत समारंभ 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.

अनिरुद्ध रविचंद्रन कोण आहेत?

अनिरुद्ध रविचंद्रन हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीतकार, पार्श्वगायक आणि संगीत निर्माता आहेत. 2012 मध्ये '3' या चित्रपटातील 'व्हाय धिस कोलावेरी डी' या गाण्यामुळे त्यांना जगभरात ओळख मिळाली. हे गाणे इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय झाले आणि देशभरात अनिरुद्धचे नाव चर्चेचा विषय बनले. त्यानंतर त्यांनी 'कथ्थी', 'मास्टर', 'विक्रम', 'जेलर', 'लिओ' आणि 'जवान' यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले. त्यांचे संगीत तमिळ चित्रपटसृष्टीच्या पलीकडे जाऊन तेलुगू आणि हिंदी चित्रपटांपर्यंत विस्तारले आहे.

हे ही वाचा

Mumbai Indians च्या संघाला मोठा धक्का! मुख्य प्रशिक्षकाने दिला राजीनामा

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी असून, तिच्या आईचे नाव कावेरी मारन आहे. काव्या ही सन ग्रुपच्या मालकीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक देखील आहे. ती अनेकदा आयपीएल सामन्यांना उपस्थित राहून आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसते, ज्यामुळे ती क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आयपीएल फ्रँचायझीची मालक म्हणून ती क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून नेहमीच चर्चेत असली तरी, ती आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES