• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी!

आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी!

येत्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार या स्पर्धेसाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी मैदानावर सरावाला सुरुवात केली.

Reported ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Sep 28, 2026, 06:55 PM IST|Updated: Sep 28, 2026, 07:50 PM IST
joinshare
आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी!

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे : जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताचे खेळाडू सध्या स्पर्धा करत आहेत. आतापर्यत भारताने 4 गोल्ड मेडल, 20 सिल्वर मेडल आणि 21 ब्रान्झ मेडल नावावर केले आहेत. भारताचे हे आशियाई खेळ सुरु असताना आता महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांच्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर  महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे आता पुन्हा एकदा नेमबाजीच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार असून, त्यासाठी त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.

 नेमबाजी हा विक्रम काकडे यांचा जुना आणि अत्यंत आवडीचा खेळ आहे. पूर्वी त्यांनी नियमितपणे नेमबाजीचा सराव केला होता. मात्र विविध जबाबदाऱ्यांमुळे काही काळ या खेळापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा बंदूक हाती घेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी टेंभुर्णी येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज यशवंत शिंदे यांच्या जागतिक दर्जाच्या ट्रॅप आणि स्कीट नेमबाजी केंद्राला भेट दिली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी त्यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. 

हे ही वाचा

आरसीबीच्या स्टार खेळाडूंची फ्रन्चायझीने केली हकालपट्टी! संघाची 2027 ची रिटेन्शन यादी जाहीर

या भेटीदरम्यान काकडे यांनी नेमबाजीचा सरावही केला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. “नेमबाजी हा माझ्यासाठी केवळ खेळ नाही, तर अनेक वर्षांपासून जपलेली आवड आहे. काही काळ त्यापासून दूर होतो, पण आता पुन्हा पूर्ण तयारीने सराव सुरू केला आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझी ही जुनी आवड पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न आहे,” असे विक्रम काकडे यांनी सांगितले. 

राष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काकडे यांनी आता नियमित सरावाला सुरुवात केली असून येत्या काही आठवड्यांत त्यांच्या सरावाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. त्याचे सरावादरम्यानचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News