SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पंतप्रधान मोदींनी घेतली पॅरा एशियन गेम्स स्पर्धेतील पदक विजेत्यांची भेट

नागोया येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण १33 पदके जिंकली. ज्यामध्ये 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 06, 2026, 01:29 AM IST | Updated: Nov 06, 2026, 01:52 AM IST
Image Credit: पंतप्रधान मोदींनी घेतली पॅरा एशियन गेम्स स्पर्धेतील पदक विजेत्यांची भेट
Join

Para Asian Games 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी एशियन पॅरा गेम्समधील पदक विजेत्यांची भेट घेतली आणि सांगितले की, त्यांचा संघर्ष आणि त्यांची कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. गेल्या महिन्यात आयची नागोया येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण ११४ पदके जिंकली. ज्यामध्ये 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने हे सिद्ध केले आहे की, क्रीडा विश्वात भारत एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. तुम्ही केवळ पदकेच जिंकली नाहीत', तर कोट्यवधी भारतीयांची मनेही जिंकली आहेत. ते पुढे म्हणाले, 'तुमचा संघर्ष आणि तुमची यशोगाथा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. पूर्वी, आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत पालक अनेकदा संकोच करत असत. लोक असे म्हणायचे की, ज्या व्यवस्थेत प्रतिभेला जोपासले जात नाही, ती व्यवस्था सुधारणे अशक्य आहे; परंतु, ज्याप्रमाणे तुम्ही हार मानली नाही, त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या ध्येयांवर ठाम राहिलो'. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES