SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पार्ट्या, सिगारेट, मद्यपान, स्त्रियांच्या मागे...', युवराज सिंगच्या वडिलांना पृथ्वी शॉचा थेट इशारा; Insta स्टोरीने क्रिकेट विश्वात खळबळ

एका मुलाखतीदरम्यान माजी क्रिकेटपटूसोबत केलेली तुलना आणि खासगी आयुष्याबद्दल केलेल्या विधानांमुळे पृथ्वी शॉ चांगलाच संतापल्याचं दिसून येत आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 09:23 IST | Updated: Nov 24, 2026, 09:46 IST
Image Credit: पृथ्वी शॉची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत (फोटो प्रातिनिधिक, सोशल मीडियावरुन साभार)
Join

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील आणि स्वत: क्रिकेटपटू म्हणून खेळलेल्या योगराज सिंग यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. योगीराज सिंग यांनी पृथ्वी शॉसंदर्भात केलेल्या विधानावरुन स्वत: पृथ्वीने थेट इन्स्टाग्राम स्टोरीतून रिप्लाय केला असून या माजी क्रिकेटपटूला इशाराच दिलाय. पृथ्वीच्या कारकि‍र्दीबद्दल, आतापर्यंतच्या वाटचालीसंदर्भात आणि वैयक्तिक वर्तनासंदर्भात योगीराज यांनी केलेलं विधान या तरुण क्रिकेटपटूला फारसं पटलेलं नाही. म्हणूनच त्याने युवराजच्या वडिलांना थेट टॅग करत इशारा दिलाय. पृथ्वीच्या इन्स्टाग्राम स्टोरीत आहे काय आणि योगीराज यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

योगीराज कुठे बोलत होते?

योगराज सिंग यांनी पृथ्वी शॉच्या घसरणीमागे त्याच्या जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत असल्याचं म्हटलेलं. यासंदर्भात त्यांनी पूर्वीच्या पिढीतील विनोद कांबळीसोबत पृथ्वीची तुलना केली होती. सौरव यदुवंशीच्या'स्पोर्ट्स लाँचपॅड'वर बोलताना योगराज यांनी अशा तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरसंदर्भात भाष्य केलं, ज्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी जे विनोद कांबळीसोबत घडलं तेच पृथ्वीसोबत घडेल असं म्हटलं आहे.

योगीराज पृथ्वी शॉचा उल्लेख करत काय म्हणाले?

"पृथ्वी शॉची कारकीर्द का घसरली? त्याच्या आधी विनोद कांबळीच्या बाबतीतही असेच घडले होते. पार्ट्या, स्त्रियांच्या मागे लागणे, सिगारेट आणि मद्यपान ही याची कारणं होती. मी एकदा कांबळीला विचारलं होतं, 'अरे बाळा, तू नक्की काय करतोयस? तुझ्याकडे किती प्रचंड प्रतिभा आहे! तू रात्री अडीच वाजता आपल्या खोलीवर परततोस! तो मला म्हणाला, 'तुमचे दिवस आता संपले आहेत, आम्ही आता वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळतोय.' दुसऱ्या दिवशी सकाळी, कोर्टनी वॉल्शने त्याला बाद केले आणि भारत तो सामना हरला. त्यानंतर, ज्या तरुणीसोबत तो होता, तिनेही त्याला सोडून दिले. मग त्याला सिगारेट किंवा दारू देणारेही कोणी उरले नाही. पृथ्वी शॉच्या बाबतीतही अगदी असेच घडले आहे. जेव्हा तुम्ही पार्ट्यांमध्ये जाता, स्त्रियांच्या मागे लागता, मद्यपान करता आणि चुकीच्या संगतीत राहता, तेव्हा तुमच्यासोबतही तेच घडणार जे त्यांच्यासोबत घडले होते," असं योगीराज यांनी म्हटलं.

पृथ्वी शॉ संतापून काय म्हणाला?

या विधानांसंदर्भातील पोस्टवर व्यक्त होताना पृथ्वी शॉने, मी माझ्या भूतकाळापासून पळ काढत नसलो, तरी माझी प्रतिमा मलिन करण्याचा किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न सहन करणार नाही, असं म्हटलं आहे. "माझा भूतकाळ हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे किंवा लाज वाटण्यासारखे काहीही नाही. मात्र, कोणीही जाणीवपूर्वक माझे नाव, माझे वैयक्तिक आयुष्य किंवा माझा भूतकाळ वापरून नकारात्मकता पसरवत असेल, अनावश्यक वाद निर्माण करत असेल, माझी प्रतिमा मलिन करत असेल किंवा माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. स्वतःचे मत मांडणे आणि कोणाला तरी लक्ष्य करून खोटी, दिशाभूल करणारी, बदनामीकारक किंवा द्वेषपूर्ण माहिती पसरवणे, यात मोठा फरक आहे. हा माझ्याकडून देण्यात आलेला एक स्पष्ट आणि अंतिम इशारा समजावा: अशी कृती करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते," असे पृथ्वीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

माझ्या शांततेला कधीही...; पृथ्वी शॉचा थेट इशारा

पृथ्वीने आपल्या प्रतिक्रियेमध्ये शेवटी, अशी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध संभाव्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. मी माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन असंही पृथ्वी म्हणालाय. त्याने रास्त टीका आणि द्वेषपूर्ण हेतूने मुद्दाम लक्ष्य करणे यांमधील फरक काय असतो याबद्दल भाष्य केलं आहे. "माझी प्रतिष्ठा, गोपनीयता आणि मान-सन्मानाचे रक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर उपाय वापरण्याचा अधिकार मी सध्या राखून ठेवतो. माझ्या शांततेला कधीही कमकुवतपणा समजू नये. मी प्रतिष्ठेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु स्वतःच्या बचावासाठी उभे राहण्यास मी अजिबात संकोच करणार नाही," असं पृथ्वी म्हणालाय.

पृथ्वी शॉच्या भूमिकेत बदल?

पृथ्वीने दिलेल्या या रिप्लायवरुन त्याने आता आपली भूमिका अधिक कठोर केल्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे. गेल्या वर्षी त्याने एका कठीण काळात मी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले होते, असं कबूल केलं होतं. परंतु आता त्याच्या या ताज्या विधानावरून तो स्वतःच्या चारित्र्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या, त्याच्या मते अयोग्य अशा टीकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अगदी कायदेशीर मार्ग वापरण्यासही तयार असल्याचं स्पष्ट होतंय. आता यावर योगीराज सिंग काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES