न्यूझीलंडविरुद्ध मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा
मागील काही काळामध्ये अनेक टीम इंडियाच्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे, आता भारतीय महिला आणि पुरुष संघाची मालिका सुरु असताना आणखी एक खेळाडूने क्रिकेटला अलविदा केला आहे.
एकिकडे भारताचा पुरुष संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे तर दुसरीकडे भारतीय महिला संघ झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. याचदरम्यान आता टीम इंडियाच्या 30 वर्षीय खेळाडूने क्रिकेटला अलविदा केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर फलंदाज सब्भिनेनी मेघनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. मेघनाने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. या स्टार खेळाडूने तिच्या करिअरचा हा मोठा निर्णय एवढ्या कमी वयामध्ये का घेतला यासंदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घ्या फलंदाज सब्भिनेनी मेघनाच्या करिअरबद्दल.
सलामीवीर फलंदाज सब्भिनेनी मेघनाने शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी सोशल मिडियावर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सोशल मिडियावर क्रिकेटर मेघनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जागतिक स्तरावर पहिल्यांदा भारतीय जर्सी घालून मैदानावर उतरणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. मी खेळाडू म्हणून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करत आहे. सुख-दुःखात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माझ्या कुटुंबाचे आभार. मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल माझे प्रशिक्षक, संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार. मला दररोज प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचेही आभार." या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
हे ही वाचा
400 धावा पार... श्रीलंकेने इंग्लंडला रडवलं, हॅरी ब्रुकचे द्विशतक व्यर्थ! ऐतिहासिक विजय केला नावावर
तिने पुढे लिहिले, "मी बीसीसीआय, आंध्र क्रिकेट असोसिएशन, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स, आरएसपीबी यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानते. मला संधी आणि व्यासपीठ दिल्याबद्दल धन्यवाद." मेघनाने कठीण काळात पाठीशी उभ्या राहिलेल्या तिच्या प्रशिक्षक, संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले. तसेच, तिच्या शानदार कारकिर्दीसाठी तिने बीसीसीआय, आंध्र क्रिकेट असोसिएशन, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स आणि आरएसपीबी यांचेही आभार मानले.
सब्बिनेनी मेघनाची कारकीर्द
सब्बिनेनी मेघनाची कारकीर्द सांगायचे झाले तर, मेघनाने 2016 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, तिने भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर 17 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने 114 एकूण धावा केल्या होत्या तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक अर्धशतक आहे आणि तिने एकूण 258 धावा केल्या आहेत. मेघना 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग होती. ती 2016 आणि 2022 या दोन्ही वर्षी महिला टी-20 आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होती.