• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /400 धावा पार... श्रीलंकेने इंग्लंडला रडवलं, हॅरी ब्रुकचे द्विशतक व्यर्थ! ऐतिहासिक विजय केला नावावर

400 धावा पार... श्रीलंकेने इंग्लंडला रडवलं, हॅरी ब्रुकचे द्विशतक व्यर्थ! ऐतिहासिक विजय केला नावावर

ट्राय सिरीजचा सामना खेळवण्यात आला, हा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने ऐतिहासिक विजय नावावर नोंदवला आहे, या सामन्याचा अहवाल सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 22, 2026, 10:34 PM IST|Updated: Oct 22, 2026, 10:50 PM IST
joinshare
400 धावा पार... श्रीलंकेने इंग्लंडला रडवलं, हॅरी ब्रुकचे द्विशतक व्यर्थ! ऐतिहासिक विजय केला नावावर

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये ट्राय सिरीजचा सामना खेळवण्यात आला, या सामन्यामध्ये इंग्ंलडच्या संघाने पहिले फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यामध्ये श्रीलंकेने आपल्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात प्रथमच 400 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण केले, अन् संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांची फलंदाजी प्रभावशाली पाहायला मिळाली आणि या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने पहिल्या इनिंगमध्ये धूमाकुळ घातला होता. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाकडून दसुन शनाकाच्या 97 आणि जनिथ लियानागेच्या नाबाद 61धावांच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडला पराभूत करून इतिहास रचला.

सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना, हॅरी ब्रुकच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत 4 गडी गमावून 429 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पवन रत्नायकेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. श्रीलंकेने 49.5 षटकांत 8 गडी गमावून 430 धावा केल्या. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध 430 धावांचे लक्ष्य पूर्ण करून इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा यशस्वी पाठलाग ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च लक्ष्य गाठण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. 

हे ही वाचा

टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर, वाचा IND vs ZIM मालिकेची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार?

दरम्यान, श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध 430 धावांचे लक्ष्य पूर्ण करून विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कोरले आहे, आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. 2006 मध्ये, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचा ऐतिहासिक पाठलाग पूर्ण केला होता. आता श्रीलंका दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शनाका आणि लियानागे यांच्या व्यतिरिक्त, पवन रत्नायकेनेही शानदार खेळी केली आणि शतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

ब्रुकच्या 116 चेंडूंतील 202 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने 4 गडी गमावून 429 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने 24 धावांत दोन गडी गमावूनही, पवन रत्नायकेच्या 130 धावा, अविष्का फर्नांडो आणि दसुन शनाका यांच्या प्रत्येकी 97 धावा आणि जनिथ लियानागेच्या 27 चेंडूंतील नाबाद 61 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 8 गडी गमावून 430 धावा करत एक ऐतिहासिक विजय नोंदवला. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 859 धावा केल्या.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News
Cricket News