6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाने घातला मैदानावर धुमाकूळ! खेळली 173 धावांची धडाकेबाज खेळी
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग मागील काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. त्याने आणखी एकदा त्याच्या खेळीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी विजयनगरमध्ये विनू मांकड ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरु आहे, या स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू सहभाग झाले आहेत. मागील काही काळापासून भारताचा माजी स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग मागील काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय अंडर 19 संघासाठी निवड झाली होती, आता त्याने देशांतर्गत सामन्यामध्ये संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. विजयनगरम येथील डॉ. पीव्हीजी राजू एसीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दिल्ली विरुद्ध चंडीगढ यांच्यामध्ये सामना पार पडला, या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.
दिल्ली विरुद्ध चंडीगढ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने संघासाठी दमदार कामगिरी केली. आर्यवीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली अंडर 19 संघाने या सामन्यामध्ये 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 289 धावा केल्या. कठीण परिस्थितीत आर्यवीरने सूत्रे हाती घेतली आणि एक मोठी खेळी खेळून संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या टोकाकडून सलामीवीर अर्णव बुग्गाने 48 धावांचे योगदान दिले, दिल्लीच्या संघाला या मजबूत सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करुन दिल्लीच्या संघाला भक्कम सुरुवात करुन दिली.
हे ही वाचा
अर्शदीप दुखापतीमुळे संघाबाहेर, बीसीसीआयने केली बदली खेळाडूची घोषणा! स्टार खेळाडू संघात सामील
आर्यवीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आर्यवीर आणि अर्णव बग्गा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या, त्यानंतर बग्गा 47 धावांवर बाद झाला. या काळात दिल्लीने 81 धावांत चार गडी गमावले. दिल्लीची धावसंख्या अचानक 179/4 झाली. त्यानंतर आर्यवीरने शांतनु यादवसोबत पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. 46व्या षटकात आर्यवीर 173 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि आठ उत्तुंग षटकार ठोकले. अर्णव बाद झाल्यानंतर, त्याने आणि यष्टीरक्षक-फलंदाज अभिराज सिंगने तिसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. अभिराजने एका चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.
आर्यवीरने सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षांखालील संघात पदार्पण केले. युवा एकदिवसीय मालिकेत, त्याने तीन डावांमध्ये केवळ 109 धावा केल्या. पावसामुळे बाधित झालेल्या पहिल्या सामन्यात, जो भारताने सात धावांनी जिंकला, आर्यवीरने 26 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आर्यवीरने ४७ धावा केल्या, पण त्याचे अर्धशतक केवळ तीन धावांनी हुकले. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात 34 धावांचे योगदान दिले. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळणाऱ्या आर्यवीरने मोठ्या स्पर्धांमध्ये आधीच अनुभव मिळवला आहे.