भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी20 मालिकेचा शेवटचा निर्णायक सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. चौथ्या सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे आता अर्शदीप सिंग हा मालिकेमधून बाहेर झाला. आता बीसीसीसआयने सामन्याच्या एक दिवसाआधी मोठी घोषणा केली आहे, टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघात अर्शदीप सिंगचा बदली खेळाडू म्हणून घोषणा केली आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे आणि उद्या, शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम टी२० सामन्यात तो खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण असे की, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग जखमी आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या पाचव्या सामन्याआधी बीसीसीआयने त्यांच्या सोशल मिडियावर अधिकृत पोस्ट शेअर केली आहे यामध्ये बीसीसीआयने लिहीले आहे की, भारताचा खेळाडू अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे भुवनेश्वर कुमारला पाचव्या कसोटीसाठी संघात सामील करण्यात आले आहे.
News Arshdeep Singh sustains blow to bowling shoulder; Bhuvneshwar Kumar added to #TeamIndia’s squad for the Bengaluru T20I. More Details https://t.co/i18NeqDLrU #INDvWI | @mflone_
— BCCI (@BCCI) October 16, 2026
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेली मालिका निर्णायक सामन्यावर पोहोचली आहे. या दोन्ही संघामध्ये 5 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये सामना भारताच्या संघाने जिंकले आहेत तर चौथ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे आता दोन्ही संघासाठी हा मालिकेचा शेवटचा सामना करो या मरो असणार आहे. दोन्ही संघांना या शेवटच्या सामन्यामध्ये मालिका जिंकण्याची संधी असणार आहे त्यामुळे आता दोन्ही संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.
हे ही वाचा
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, मयंक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार.