SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

स्मृती मानधना करणार नव्या पर्वाला सुरुवात, कधी आणि कुठे पाहता येणार IND vs ZIM सामना?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये ऐतिहासिक सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार, भारतीय महिला संघ नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 16, 2026, 02:45 PM IST | Updated: Oct 16, 2026, 03:00 PM IST
Join

भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ यांच्यामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना आज रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघ आता नव्या कर्णधारासह टीम इंडियाची नवी सुरुवात करणार आहे, हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर स्मृती मानधना भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे, चॅम्पियन ट्रॅाफीमध्ये भारतामध्ये होणार आहे त्याआधी भारताच्या संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. आता भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला यासामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ यांच्यामध्ये मालिकेचा पहिला सामना हा 16 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे करण्यात आले आहे. पहिल्यांदाच ही मालिका खेळवली जात आहे, त्यामुळे ही मालिका ऐतिहासिक ठरणार आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याला सुरुवात ही संध्याकाळी 7 वाजता होणार आहे, या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार हे मैदानावर 6.30 वाजता येतील.

भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ या सामन्याचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदीवर पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॅाटस्टारवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. स्मृती मंधाना पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच टीम इंडियाची जर्सी परिधान करणार आहे. ती आपल्या कार्यकाळाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमध्ये मुंबईच्या या खेळाडूचे स्थान पक्के, कोणत्या खेळाडूची घेणार जागा?
 

नुकतेच झालेले मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या सामन्याच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यामध्ये महिला संघासाठी या सामन्यात मोफत एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएनएसशी बोलताना एका सूत्राने सांगितले, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना मोफत प्रवेश देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार घेण्यात आला आहे असे सांगितले आहे. नवरात्री सुरु आहेत या सामन्यासाठी अधिक महिला या महिला क्रिकेटसा पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे रायपूरमधील सणासुदीचा काळ दुप्पट होईल.

भारतीय महिला संघ : शफाली वर्मा (उपकर्णधार), स्मृती मानधना (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकिपर), गुणालन कमलिनी, दीप्ती शर्मा, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अनुष्का शर्मा, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, श्री चरणी, जिंतीमणी कलिता, निकी प्रसाद, प्रेमा रावत

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES