SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात उशीर, 'हे' खेळाडू ठरलेत कारण

IND VS NZ T20 And ODI Series : भारतीय संघाचे वनडे आणि टेस्ट संघ 28 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहेत. मात्र त्यापूर्वी अद्याप बीसीसीआयने या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नसून टीम इंडियाची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 14, 2026, 01:27 PM IST | Updated: Oct 14, 2026, 02:19 PM IST
Image Credit: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात का होतोय उशीर
Join

IND VS NZ T20 And ODI Series : 22 ऑक्टोबर पासून टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टेस्ट संघासाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि टेस्ट संघाची घोषणा होण्यास उशीर का होतोय याचं कारण आता समोर आलं आहे. भारतीय संघाचे वनडे आणि टेस्ट संघ 28 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहेत आणि त्यापूर्वीच संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धची भारताची वनडे सीरिज ही 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

संघ जाहीर करण्यात का होतोय उशीर?

प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या दोघांच्या फिटनेस रिपोर्टला उशीर होत असल्याने  वनडे आणि टेस्ट संघाची घोषणा करण्यात सिलेक्टर कमीटीला उशीर होत असल्याचं समोर आलं आहे. 30 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाला हॅमस्ट्रिंगच्याची समस्येचा त्रास जाणवला. त्यानंतर त्याला वनडे सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आणि 'सेंटर ऑफ एक्वॅलन्स' मध्ये पाठवण्यात आले. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार  त्याला केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तिथे पाठवण्यात आले होते. तरीही तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला. तर वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील 'सेंटर ऑफ एक्सेलेन्स'मध्ये आहे. 25 ऑक्टोबर रोजी त्याची 'रिटर्न-टू-प्ले' मॅच सिम्युलेशन चाचणी होण्याची अपेक्षा आहे, याचा अर्थ असा की त्याला सामन्यासारख्या परिस्थितीत ठेवून त्याची टेस्ट घेतली जाईल.

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की 'इंडिया ए' संघाच्या पहिल्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी ऋषभ पंत उपलब्ध नसेल. इराणी चषक स्पर्धेदरम्यान पंतला 'साइड स्ट्रेन'ची दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्याबाबत 'सेंटर ऑफ एक्सेलेन्स' आता अधिक खबरदारी घेत आहे. कारण परवानगी मिळाल्यानंतर खेळाडूंना पुन्हा दुखापत झाल्याच्या घटनांमुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णाला खूप गंभीर दुखापत झालेली नाही. तरीही सीओई कोणताही धोका पत्करायला तयार नाही. प्रसिद्ध कृष्णा हा वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी वेगवान गोलंदाजीच्या गटातील गटातील एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिसाठी पंत हा भारतीय संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असेल. त्यामुळे  या दोन्ही खेळाडूंसाठी तीन आठवड्यांचा रिकव्हरी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राणाबाबत सांगायचे तर निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याला वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही संघांमध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक असल्याचे समजते.  शिवाय राणा आठव्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्यायही उपलब्ध करून देतो.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES