SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

डाएट करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी! वजन कमी करणारा आहारच वाढवतोय वजन, नव्या संशोधनामधून धक्कादायक खुलासा

डाएट केलं म्हणजेच खाण्यावर नियंत्रण ठेवलं तर वजन कमी होणारच, असा तुमचा समज असेल तर तुम्ही नव्याने केलेल्या संशोधनामधून समोर आलेल्या काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. नेमकं हे संशोधन काय आणि यात कोणती माहिती समोर आलीये पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Sep 30, 2026, 12:46 PM IST | Updated: Sep 30, 2026, 12:58 PM IST
Image Credit: नव्या संशोधनामधून समोर आली थक्क करणारी माहिती (प्रातिनिधिक फोटो, एआयवरुन साभार)
Join

वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी डाएटचा मार्ग अवलंबला असणार. कधी अगदी डॉक्टरांच्या सल्ल्याने तर कधी स्वत: खाण्यावर नियंत्रण ठेऊन वजन कमी होतंय का हे पाहण्याचा प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी केला असेल. मात्र डाएट केलं की वजन कमी होतं या विचाराला छेद देणारं एक संशोधन समोर आलं असून यामधून एक वेगळाच ट्रेंड समोर आलाय आहे. नेमकं हे संशोधन काय आणि कोणती माहिती समोर आलीये ते पाहूयात...

नेमकं संशोधन काय आणि कोणी केलंय?

गेल्या काही वर्षात वजन कमी करण्यासाठी साध्या डाएटऐवजी कॅलरी कमी करणाऱ्या डाएटचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मात्र, अशा डाएटमुळे सुरुवातीला वजन वेगाने घटत असले, तरी असा डाएट दीर्घकाळासाठी कायम ठेवणे आव्हानात्मक असते. त्यामुळेच असं डाएट मध्येच सोडून दिल्यास बहुतांश लोकांचे वजन पुन्हा वाढू लागते, असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.  

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधनांनुसार, कॅलरी सेवन नियंत्रित ठेवल्याने वजन, कंबर कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील शर्करा म्हणजेच साखरेचे प्रमाण व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. परिणामी, टाइप-2 मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो.

काय आहे कॅलरी कमी करणारे डाएट?

कॅलरी घटवणाऱ्या डाएटमध्ये व्यक्ती आपल्या दैनंदिन आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचे (कॅलरी) प्रमाण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते. यामध्ये दिवसातील विशिष्ट वेळेतच जेवणे, एक दिवस सोडून म्हणजेच दिवसाआड अतिशय कमी कॅलरी घेणे आणि 'फास्ट 800' सारख्या डाएट पद्धतींचा समावेश आहे.  'फास्ट 800' डाएट पद्धत ही प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टर आणि पत्रकार डॉ. मायकेल मोस्ले यांनी विकसित केली आहे. यात प्रामुख्याने भूमध्य-शैलीतील आहार (Mediterranean Diet) आणि इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजेच अधूनमधून उपवास करण्याच्या माध्यमातून वजन कमी केलं जातं.

शरीर जितकी ऊर्जा खर्च करते, त्याहून कमी कॅलरी आहारातून घेतल्यास ते शरीरातील साठवलेली चरबी वापरू लागते व वजन कमी होते, असं या मागील शास्त्र आहे. अशा पद्धतीचं डाएट वैद्यकीय देखरेखीखाली केले जाते.

वजन वाढण्याची कारणं

असं कॅलरी कमी करणारे डाएट वजन वाढण्याची कारणं समजून घेऊयात...
संप्रेरकांमधील (हार्मोन्समधील) बदल : वजन कमी होताच भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बदलतात व भूक वाढू लागते. म्हणजेच शरीरातील संप्रेरकांमधील बदल झाल्याने वजन वाढते.

ऊर्जेचा कमी वापर : वजन कमी झाल्यामुळे शरीर कमी ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे वजन कमी होण्याचा वेग मंदावतो.

इच्छाशक्तीचा आभार : बाजारात अतिप्रक्रिया केलेले अन्न स्वस्त व सहजरीत्या उपलब्ध असल्याने इच्छाशक्ती टिकवून ठेवणे कठीण जाते.

मानसिक व शारीरिक परिणाम : सतत लागणाऱ्या भुकेमुळे मूड बदलणे, झोपेवर परिणाम होतो.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला काय?

आहारात पुरेसे प्रथिने व भाज्या, डाळी, कडधान्ये असे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मीठ, अतिरिक्त साखर, स्निग्ध पदार्थ व मद्यपान कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवणाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे, नियमित व्यायाम करावा व भुकेच्या नैसर्गिक संकेतांकडे अधिक लक्ष द्यावे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES