SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट पुन्हा घराच्या शोधात आहे. पाली हिलमधील भाड्याच्या इमारतीचा पुनर्विकास होणार असल्याने २०२६ अखेर किंवा २०२७ च्या सुरुवातीला मुंबईत दुसरीकडे स्थलांतर करण्याची शक्यता आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 03:19 PM IST | Updated: Nov 05, 2026, 03:29 PM IST
Image Credit: आमिर खान
Join

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी गौरी स्प्रॅट पुन्हा एकदा नव्या घराच्या शोधात आहेत. मुंबईतील पाली हिल परिसरातील ज्या भाड्याच्या घरात या दोघांनी लग्न केले, तेच घर आता पुनर्विकासाच्या प्रक्रियेत जाणार असल्याने त्यांना दुसरीकडे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या जोडप्याला पुन्हा घर बदलण्याची तयारी करावी लागत आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

लग्न झालेल्या घरातून पुन्हा बाहेर पडणार

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी 5 जुलै 2026 रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाह केला होता. हे घर पाली हिल परिसरातील नर्गिस दत्त रोडवर आहे. पण आता या इमारतीच्या पुनर्विकासाचा करार झालाय. त्यामुळे रहिवाशांना जागा रिकामी करावी लागणार आहे. या कारणामुळे आमिर आणि गौरी यांना पुन्हा घर शोधण्याची वेळ आली आहे.

इमारतीतील चार फ्लॅट भाड्याने

आमिर खानने या इमारतीत चार अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. त्यात तो आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. आता इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय झाल्याने ही व्यवस्था बदलावी लागणारेय. आमिर आणि गौरी मुंबईतील दुसऱ्या उपनगरात भाड्याचे घर शोधताय.

दीड वर्षापूर्वीही रुम बदलण्याची वेळ

आमिर खानच्या स्वतःच्या युनियन पार्क येथील घराचाही पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे सुमारे दीड वर्षापूर्वी त्याने तेथून बाहेर पडून पाली हिल परिसरात भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती. आता या भाड्याच्या इमारतीचाही पुनर्विकास होणार असल्याने त्याला पुन्हा स्थलांतर करावे लागणार आहे. म्हणजेच स्वतःच्या घराचे काम पूर्ण होईपर्यंत आमिरला तात्पुरत्या निवासाची व्यवस्था बदलावी लागणार आहे.

2030 पर्यंत नव्या घराची प्रतीक्षा?

युनियन पार्कमधील बेला व्हिस्टा आणि मरीना अपार्टमेंट्स या इमारतींच्या पुनर्विकासानंतर तेथे नवीन उंच इमारत उभी राहणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आमिरला तेथे नव्या घरात राहता येईल. हे बांधकाम २०३० च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण कुटुंबासाठी ‘स्काय व्हिला’?

आमिर खान आपल्या कुटुंबासाठी मोठे ‘स्काय व्हिला’ तयार करण्याच्या विचारात असल्याचेही यापूर्वी वृत्त आले होते. या घरात कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतंत्र जागा आणि एकत्र वेळ घालवण्यासाठी सुविधा असतील, अशी माहिती माध्यमांनी दिली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES